Home Breaking News गांधी जयंती उत्साहात साजरी ; लहानग्यांनी घेतली गांधीवेषात स्वच्छतेची शपथ

गांधी जयंती उत्साहात साजरी ; लहानग्यांनी घेतली गांधीवेषात स्वच्छतेची शपथ

59

#Chandrapur

• गांधी जयंती उत्साहात साजरी ; लहानग्यांनी घेतली गांधीवेषात स्वच्छतेची शपथ

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर : केजीएन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, चंद्रपूर येथे महात्मा गांधी जयंती मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील बालगोपाळांनी गांधीजींच्या वेशभूषेत सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमातून गांधीजींचा ‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ यांचा संदेश जिवंत झाला.

कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वच्छता मोहीम, जी शाळा परिसरात आणि आजूबाजूच्या भागात राबवण्यात आली. या उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी सक्रिय सहभाग घेत “स्वच्छ भारत, सुंदर भारत” या संकल्पनेला चालना दिली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश समाजात पोहोचवण्याची प्रतिज्ञा केली.

याप्रसंगी शाळेचे संस्थापक महेमुद शेख आणि प्राचार्या सौ. सुजाता करमणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधींच्या विचारांचा जागर घडविला. “गांधीजींचे विचार हे आजही समाजाला योग्य दिशेने नेणारे दीपस्तंभ आहेत”, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या आदर्शावर चालत राष्ट्र उभारणीत सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.