Home Breaking News • भाजपा बल्लारपूरतर्फे माता राणी विसर्जनानिमित्त प्रसादाचे वितरण

• भाजपा बल्लारपूरतर्फे माता राणी विसर्जनानिमित्त प्रसादाचे वितरण

111

#Ballarpur

• भाजपा बल्लारपूरतर्फे माता राणी विसर्जनानिमित्त प्रसादाचे वितरण

सुवर्ण भारत: विशाल डुंबेरे
जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

बल्लारपूर : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतीय जनता पार्टी, बल्लारपूर शहर मंडळातर्फे माता राणीच्या विसर्जनानिमित्त प्रसाद वितरण कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने उत्साहात पार पडला.काल
दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आर्य भवन समोर, वस्ती विभाग, बल्लारपूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला आमदार डॉ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विसर्जनासाठी निघालेल्या विविध मंडळ अध्यक्षांचा “माता की चुनरी”, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंदनसिंह चंदेल, भाजपा जिलाध्यक्ष हरीश शर्मा (चंद्रपूर ग्रामीण), तसेच भा.ज.पा शहराध्यक्ष ॲड. रणंजय सिंह उपस्थित होते.
कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर व नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.
ज्येष्ठ नेते शिवचंद दिवेदी, काशिनाथ सिंह, राजू दारी, निलेश खरबडे, समीर केने, जगदीश गहेरवार, रामधन सोमानी,अशोक गुप्ता, हनुमान सिंह,शंकर कम्पेल्ली ,भाजपा शहर मंडळाचे पदाधिकारी महामंत्री मनीष, पांडे, सतीश कनकम, घनश्याम बुरडकर, गुलशन शर्मा,राजू दासरवार, प्रभदीप सचदेवा,नीरज झाडे, बबलू गुप्ता, पूनमचंद बहुरिया, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली जोशी,रेणुका दुधे,आरती अक्केवार,वर्षा सुन्चुवार, कांता ढोके, सारिका कनकम, सुरेखा श्रीवास्तव,युवा मोर्चा अध्यक्ष मिथलेश खेंगर,महामंत्री रामेश्वर पासवान, विशांक ठाकुर, अरविंद वर्मा, पवन दिवेदी, चंदन गहेरवार, सचिव कनकम, नितीन बहुराशी आदि मंडळींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण भाजपा बल्लारपूर शहर मंडळाने अथक परिश्रम घेतले. प्रसाद वितरणाच्या निमित्ताने परिसरात भक्तीमय आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले.