Home Breaking News #chandrapur • चंद्रपूर शहरात पावसाची दमदार सलामी!

#chandrapur • चंद्रपूर शहरात पावसाची दमदार सलामी!

75

#chandrapur
• चंद्रपूर शहरात पावसाची दमदार सलामी!

सुवर्ण भारत | किरण घाटे: चंद्रपूर (विशेष जिल्हा प्रतिनीधी)

चंद्रपूर : एकिकडे चंद्रपूर जिल्हा ओलादुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत असताना आज रविवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान चंद्रपूर शहरात अर्धा ते पाऊण तास पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे काही वेळ रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही राजकीय पक्षांनी शेतकरी बांधवांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा अशी मागणी केली आहे.