#Nagbhid
• गिरगाव येथे स्वच्छता अभियान आणि आरोग्य शिबीर
सुवर्ण भारत: निरंजन बोरकर
#नागभिड तालुका प्रतिनिधी

गिरगाव:- गावचा विकास हा सर्व गावकरी यांच्या सहकार्याने लोकसहभागातून होत असतो.ग्रामपंचयत गिरगाव ने मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान मधे सहभाग घेतला आहे.
त्यामुळे गावाला एक सार्वगिन विकास साधण्यासाठी संधी मिळाली आहे यासाठी सर्व गावकरी यांनी आपले घर सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन गिरगाव येथील सरपंच गिता अशोक बोरकर यांनी केले आहे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान आणि शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये ग्रामपंचायत ने भाग घेतला आहे त्याच्याच एक भाग म्हणून गिरगाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले आणि स्वच्छता करण्यात आली.
तसेच आरोग्य शिबीर लावण्यात येऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत गिरगाव च्या सरपंच गिता अशोक बोरकर, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गट, सखी,आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

