Home Breaking News #Ghugus •नवचेतना बांधवांतर्फे मध्यपाश आजारावर जनजागृती •घुग्घुस आरोग्य केंद्रात मार्गदर्शन शिबिर...

#Ghugus •नवचेतना बांधवांतर्फे मध्यपाश आजारावर जनजागृती •घुग्घुस आरोग्य केंद्रात मार्गदर्शन शिबिर संपन्न

98

#Ghugus
• नवचेतना बांधवांतर्फे मध्यपाश आजारावर जनजागृती

• घुग्घुस आरोग्य केंद्रात मार्गदर्शन शिबिर संपन्न

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : व्यसनमुक्त जीवनाकडे समाजाचे पाऊल वळावे, यासाठी नवचेतना समुह, घुग्घुस यांच्या वतीने व फ्रीडम आंतरसमूह चंद्रपूरच्या पुढाकाराने मध्यपाश (मद्यव्यसन) आजारावर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडले.
या कार्यक्रमात ‘अल्कोहोलिक्स अनॅनिमस’ या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी कोणताही आर्थिक खर्च न करता मोफत उपचार व मदत मिळू शकते, याबाबत माहिती देण्यात आली. या जनजागृती मोहिमेंतर्गत बुधवार, १ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये विशेष मोफत जनजागृती केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पुणे येथील पत्रकार परिषदेत मुकुंद के., राजीव एस., हर्षद जी. आणि इम्रान एस. यांनी दिली.
घुग्घुस येथे दर सोमवारी व शुक्रवार सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत, जनता विद्यालय येथे व्यसनमुक्तीविषयक मार्गदर्शन व सल्ला शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पडगीलवार यांच्यासह आरोग्य कर्मचारी आणि नवचेतना समुहाचे बांधव – योगेश एन., केशव टि., रामु पी., तुलसीदास कुंभारे, मंगेश, अमोल, श्याम, योगेश बी., श्यामराव, अजय, प्रदीप, गुड्डू, बंडू, राजू आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे घुग्घुस परिसरात व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण होत असून, या कार्यास सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.