#Ghugus
#घुग्घुस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस उत्साहात साजरा
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस : शहरात अनेक वार्डा-वार्डातील बौद्ध विहारात बौद्ध समाज बांधवांनी धम्मचक्र प्रवर्तन दिवस विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच सामुहिक बौद्ध विहारात सामुहिक वंदना घेण्यात आले, आपआपले परिसरातील दोन,दोन रांगानी रॅली काढण्यात आली.
बाबासाहेब अमर रहे, अमर रहे नारे देत एकत्रित येऊन नवबौद्ध स्मारक परिसरातील नवनिर्माण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येवुन त्यांच्या पुतळ्यास दिपजव्लीत करण्यात आली.
विविध ठिकाणी भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,पाणी बाटल, शीतपेय देण्यात आले.
सर्व प्रथम तथागत गौतम बुद्ध, महामानव प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच सामुहिक बौद्ध वंदना घेण्यात आले.
धम्मचक्र प्रवर्तन दिवस व विजयादशमी सामाजिक ऐक्य व बंधुभाव वाढवणारा दिवस आहे.
याप्रसंगी मोठ्या उत्साहात सर्व समभाव समाज, सामाजिक नेते,राजकीय पक्ष नेते व सर्व बौद्ध विहारात अध्यक्ष, पदाधिकारी बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येत रॅलीत उपस्थित होणुन शांतिपूर्वक तहसील कार्यालयासमोर नवनिर्माण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येवुन समारंभ करण्यात आले.

