• हल्ल्याच्या निषेधार्थ बल्लारपूर न्यायालयीन कामकाज ठप्प
वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्रीमान भूषण गवई यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत बल्लारपूर येथील न्यायालयात दिनांक ८ ऑक्टोबर रोजी अधिवक्ता संघाच्या वतीने बार रूममध्ये विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकमताने निषेध ठराव पारित करण्यात आला आणि न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निषेध बैठकीस बल्लारपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. आय.आर. सय्यद, उपाध्यक्ष अॅड. किशोर पुसलवार, सचिव अॅड. संजय बोराडे यांच्यासह अॅड. विकास गेडाम, अॅड. बालाजी विधाते, अॅड. मेघा भाले, अॅड. राजेश लिंगे, अॅड. मंगेश लोहे, अॅड. अरविंद तितरे, अॅड. नाजिम खान, अॅड. संदीप येरणे, अॅड. आदित्य खरतड, अॅड. शुभांगी साठे, अॅड. शीतल वैरागडे, अॅड. सोमेश्वर सोमवंशी, अॅड. रमण पुणेकर, अॅड. विशाल मून, अॅड. संदेश हस्ते, अॅड. बंडू खनके, अॅड. सुमित आमटे, अॅड. मंगल जीवने आदींची उपस्थिती होती.
माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना अधिवक्त्यांनी न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवर घाला घालणाऱ्या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला. या घटनेमुळे देशातील न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.



