#Jivti
• बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण मागणीसाठी निवेदन
सुवर्ण भारत चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.
जिवती : महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी अखिल भारतीय बंजारा सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश पवार यांनी इंद्रनीला नाईक राज्यमंत्री व मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
१९१८ च्या हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात असल्याचा ऐतिहासिक पुरावा असल्याचे निवेदनात नमूद करत, महाराष्ट्र शासनाने या गॅझेटला मान्यता दिल्याने आरक्षणाची मागणी केली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही हे आरक्षण मिळावे, अशी नम्र विनंती करण्यात आली. या राज्यांतील बंजारा बांधवांशी रोटी-बेटीचे संबंध असल्याने सर्वजण सगे-सोयरे असल्याचा युक्तिवादही निवेदनात आहे.मागील दशकांपासून सुरू असलेल्या या मागणीमुळे राज्यभरात बंजारा समाजाकडून आंदोलने तीव्र झाली असून, केंद्राकडे शिफारस करण्याची मागणी जोर धरत आहे.



