#chandrapur
• सारिका कनकम यांचे जलद निर्णय व कार्यक्षमतेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गांधी वॉर्डमधील पाणीटंचाईस कायमचा विराम
सुवर्ण भारत : शंकर महाकाली

बल्लारपूर : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड व गांधी वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेली पाणीटंचाईची गंभीर समस्या माजी नगरसेविका सारिका कनकम यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे सोडवली गेली. नागरिकांना दिलासा मिळवत त्यांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. आंबेडकर वॉर्डातील सात नळ चौकाजवळील नगरपालिका ट्यूबवेल दिनांक १० ऑक्टोबर रोजी अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला होता. परिणामी, संपूर्ण परिसरात पाणीपुरवठा खंडित झाला आणि नागरिकांना दोन-तीन दिवसांपासून पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत होता.
स्थानिक नागरिक व नलधारकांनी ही बाब सारिका कनकम यांच्यापर्यंत पोहोचवताच त्यांनी तात्काळ नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून ट्यूबवेलची मोटर दुरुस्त करण्याचे आदेश दिले. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने काम करून पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरू केला.
दरम्यान, गांधी वॉर्डात रोहित कामतवार यांच्या निवासस्थानाजवळील जलप्राधिकरणाची पाइपलाइन दोन ठिकाणी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. या भागात राहणाऱ्यांना केवळ पाण्याचा अभाव नव्हे, तर रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते. या समस्येची माहिती मिळताच सारिका कनकम यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पाइपलाइन दुरुस्तीचे काम यशस्वीरित्या पूर्ण करून घेतले.
या कामगिरीमुळे दोन्ही वॉर्डांतील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सारिका कनकम यांचे विशेष आभार मानले आहेत. त्यांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या वेळी चंदनसिंह चंदेल (माजी सदस्य, वन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य) व हरीश शर्मा (जिलाध्यक्ष, भाजपा चंद्रपूर / माजी नगराध्यक्ष, बल्लारपूर नगरपरिषद) यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र. १४ मध्ये आणखी विकासकामांची गती वाढवण्याचा निर्धार करण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी सतीश कनकम (महामंत्री, भाजपा बल्लारपूर), प्रीती मद्देलवार, रंजना रिंगणे, राजम जनजार्ला, सागर अंबाईवार, रवि फुलझले, रोहित कामतवार, पवन कोत्तूर, अनिल समुद्रवार, विजय पेळपेल्लीवार, निखिल पोहणे, अतुल समुद्रवार, तसेच अनेक महिला व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारिका कनकम यांच्या वेळेवर व परिणामकारक कृतीमुळे वॉर्डातील लोकांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या पुढील कार्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

