Home Breaking News #Ballarpur • वरोऱ्यात पोलीस विभागातर्फे “रन फॉर युनिटी” रॅली व वृक्षारोपण...

#Ballarpur • वरोऱ्यात पोलीस विभागातर्फे “रन फॉर युनिटी” रॅली व वृक्षारोपण कार्यक्रम

84

#Ballarpur

• वरोऱ्यात पोलीस विभागातर्फे “रन फॉर युनिटी” रॅली व वृक्षारोपण कार्यक्रम

वरोरा : दिनांक 31 ऑक्टोबर लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज वरोरा शहरात पोलीस विभागाच्या वतीने “रन फॉर युनिटी” रॅली तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे ३१ ऑक्टोबर हा दिवस देशभरात एकता दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या अखंडतेसाठी आणि एकतेसाठी सरदार पटेल यांनी दिलेले योगदान स्मरणात ठेवून वरोरा पोलीस विभागाने या दिवशी विशेष उपक्रम राबविला.

रॅलीचे आयोजन पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार, तांबलवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रॅलीला लोकमान्य विद्यालय आणि कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

रॅलीने नगर परिषद चौक, आंबेडकर चौक व वीर सावरकर चौक मार्गे प्रस्थान केले. रॅलीनंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पोलीस स्टेशनला भेट देत पोलिसांच्या कामकाजाची माहिती, तसेच शस्त्रसामग्रीचे प्रात्यक्षिक पाहिले. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, नागरिक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी केले.