#chandrapur
• राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरणार्थ विदर्भ किसान मजूर काँग्रेसकडून अभिवादन”
किंवा
• “इंदिराजींच्या विचारांचा आदर्श घेऊन कार्य करा माजी.खा. नरेशबाबू पुगलिया”
सुवर्ण भारत:शंकर महाकाली
चंद्रपूर : देशाच्या अखंडतेसाठी प्राणार्पण करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शिनी चौक येथे संपन्न झाला.
यावेळी युवा नेते राहुलबाबू पुगलिया यांच्या हस्ते राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “राष्ट्रमाता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांनी देशाच्या अखंडतेसाठी प्राणार्पण केले. त्या आपल्या प्रेरणास्त्रोत असून आदर्श आहेत. त्यांच्या विचारसरणी व कार्यपद्धतीतून देशभक्ती, निष्ठा आणि सेवाभावाचा संदेश मिळतो. आपणही त्यांच्या आदर्शांचा अवलंब करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
श्रद्धांजली कार्यक्रमानंतर इंदिरा गांधी गार्डन स्कूल व न्यू इंग्लिश हायस्कूल येथील शिक्षक व शिक्षिकांनीही पुतळ्यास पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
या प्रसंगी विदर्भ किसान मजूर काँग्रेसचे जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक अशोक नागापूरे, शहराध्यक्ष देवेंद्र बेले, चंद्रशेखर पोडे, स्वप्नील तिवारी, पंकज गुप्ता, विनोद पिंपळशेंडे, कामगार नेते रामदास वाग्दरकर, कृष्णन नायर, विरेंद्र आर्य, गजानन दिवसे, अनिल तुंगीडवार, व्ही. के. मुन, सुधाकरसिंह गौर, रतन शिलावार, अजय महाडोळे, अनंता हुड, बाबुलाल करुनाकर, आतिश आक्केवार, शेखर कोतपल्लीवार, श्रीकांत पुरलवार, सुनिल दुधे, महेश ठोबरे, आकाश कुक्कडकर, आनंद सिंग, गोपाल कुडूपले, सतिश निस्वटला, अंकुश नारलावार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “इंदिराजी अमर रहे… जब तक सूरज चांद रहेगा, इंदिराजी तेरा नाम रहेगा…” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

