#Ballarpur
• महर्षी कर्वे पुण्यतिथीनिमित्त एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात श्रद्धांजली कार्यक्रम
• महिला शिक्षणाचे जनक महर्षींच्या कार्याचा घेतला आढावा
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर, दि. ९ नोव्हेंबर :
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे संस्थापक, समाजसेवक व महिला शिक्षणाचे प्रवर्तक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बल्लारपूर येथील महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण व ज्ञानसंकुल येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महर्षी कर्वे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. महिला शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी त्यांनी उभारलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “महर्षी कर्वे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही महिलांच्या शिक्षणासाठी जे प्रयत्न केले, त्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन समाजातील महिलांच्या प्रगतीसाठी कार्य करावे.”
कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून महर्षी कर्वे यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
या वेळी सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त, सहप्राध्यापक लाभे सर, नेहा जीवतोड, तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ हे महर्षी कर्वे यांच्या प्रेरणेने १९१६ साली स्थापन झाले असून, गेल्या शतकाशून अधिक काळ महिला शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

