Home Breaking News #Ballarpur • महिला सम्मेलनात गुंजला संकल्प — “एकच ध्येय, समृद्ध बल्लारपूर!”

#Ballarpur • महिला सम्मेलनात गुंजला संकल्प — “एकच ध्येय, समृद्ध बल्लारपूर!”

101

#Ballarpur

• महिला सम्मेलनात गुंजला संकल्प — “एकच ध्येय, समृद्ध बल्लारपूर!”

सुवर्ण भारत : शंकर महाकाली

बल्लारपूर : भारतीय जनता पार्टी, बल्लारपूर शहर तर्फे आयोजित भव्य महिला संमेलनात
“संकल्प एकच — समृद्ध बल्लारपूर!” हा नारा जोरदारपणे घुमला.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे माजी वनमंत्री व बल्लारपूर विधानसभा आमदार डॉ. सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. कार्यक्रमाला मूर्त रूप देण्यात वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपचे वरिष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांचा विशेष सहभाग राहिला.
या संमेलनात जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरीश शर्मा, शहराध्यक्ष अॅड. रणंजय सिंह, महिला मोर्चा अध्यक्षा व कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका वैशाली जोशी, शहर संघटन महामंत्री मनीष पांडे, शहर महामंत्री देवा वाटेकर, तसेच सतीश कनकम, घनश्याम बुरडकर, निलेश खरबडे, राजु दरी, रेणुका दुधे, गुलशन शर्मा, मिथलेश खेगर, सोनू दरी, आरती अक्केवार, वर्षा सुन्चुवार, कांता ढोके, सारिका कनकम, जयश्री मोहुर्ले, सुवर्ण भटारकर, पूनम मोडक, संध्या मिश्रा, बेबी केशकर, डॉ. सुरेखा श्रीवास्तव, श्रावंती इसम्पाली, दीपमाला यादव, गुलशन खान, गायत्री हिरण, उत्तरा सोंत्ताके, सालू कुम्हारे, सय्यदा मॅडम, उन्नति टेकाडे, सुनीता निवालकर, नजमा खान, रेखा चंडाले, गीता गोंदे, शीतल निषाद, प्रज्ञा शेंडे, वनिता चक्रवर्ती, श्रृंखला चौधरी, शबाना खान, कुंती कश्यप, जाधव मॅडम, प्रमिलाताई, परमेश्वरी राऊत आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला सोशल मीडिया प्रमुख प्रियंका शेंडे तसेच शहरातील सर्व प्रभागांतील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून पक्षाच्या उमेदवाराला ऐतिहासिक विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी वक्त्यांनी नमूद केले की, यावेळी नगर परिषद अध्यक्षपद महिला राखीव असल्यामुळे भाजप महिला मोर्च्यावर अधिक मोठी जबाबदारी आहे.
महिला सक्षमीकरणाचा संदेश देत “महिला शक्ती हीच विकासाची खरी दिशा आहे” हा प्रभावी संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी “भारत माता की जय”, “जय विदर्भ”, “जय बल्लारपूर” आणि “जय भाजपा परिवार” अशा घोषणांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.