Home Breaking News • बल्लारपूरचा गौरव! • एशिया मास्टर ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये • बल्लारपूरकरांचा झेंडा...

• बल्लारपूरचा गौरव! • एशिया मास्टर ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये • बल्लारपूरकरांचा झेंडा फडकला

153

• बल्लारपूरचा गौरव!

• एशिया मास्टर ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये
• बल्लारपूरकरांचा झेंडा फडकला

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई येथे दिनांक 5 ते 9 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या एशिया मास्टर अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये बल्लारपूर शहरातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत भारताच्या संघात सहभागी होऊन शहराचे तसेच जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
या स्पर्धेत KGN शाळेचे स्पोर्ट्स टीचर रमेश नातरगी, बल्लारपूर पेपर मिलचे कर्मचारी अजय शाह, संतोष आत्राम, नमोद चोखांद्रे, वनविभागाचे कर्मचारी पठान सर, तसेच WCL चे निवृत्त कर्मचारी नारायण कुडे, पोनलवार, लिंगय्याजी गुजरला आणि देवाअन्ना यांनी सहभाग घेतला.
या सर्व खेळाडूंनी 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 1500 मीटर, 5000 मीटर वॉक, तसेच शॉटपुट, जॅव्हलिन थ्रो, लाँग जंप आणि हाय जंप अशा विविध स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण बल्लारपूर शहरवासीयांतर्फे सर्व खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करण्यात आले आहे. या यशामुळे बल्लारपूरच्या क्रीडाक्षेत्रात नवी प्रेरणा निर्माण झाली असून, युवकांसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.