Home Breaking News • आरटीओंच्या कारवाईचे आरपीआयचे(आठवले)जिल्हाध्यक्ष गौतम तोडेंनी केले स्वागत! • आरटीओ पथकाची विशेष...

• आरटीओंच्या कारवाईचे आरपीआयचे(आठवले)जिल्हाध्यक्ष गौतम तोडेंनी केले स्वागत! • आरटीओ पथकाची विशेष मोहीम! •  अनेक दोषी वाहनांना केला दंड

121

• आरटीओंच्या कारवाईचे आरपीआयचे(आठवले)जिल्हाध्यक्ष गौतम तोडेंनी केले स्वागत!
• आरटीओ पथकाची विशेष मोहीम!
•  अनेक दोषी वाहनांना केला दंड

चंद्रपूर ◼️किरण घाटे ◼️

अपघात टाळण्यासाठी मोटार वाहन कायदा प्रमाणे प्रत्येक मालवाहू ट्रक ट्रॅक्टर,डंम्पर ,ट्राॅली व प्रवाशी वाहतूक असणा-या जीप आणि कार यांना रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. पण अनेक जण या कडे दुर्लक्ष करून रिफ्लेक्टर नसलेली व लंम्प बंद असलेली वाहने रस्त्याच्या कडेला उभे ठेवतात.
अश्या वाहनांच्या अलगर्जीपणा मुळे बरेच अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी आपल्या पथकाकडून अश्या रिफ्लेक्टर न लावलेल्या वाहनांवर चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या बद्दल चंद्रपूर जिल्ह्याचे आरपीआय आठवले गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, जिल्हा सरचिटणीस हंसराज वनकर,नमा रहबल व पार्टीच्या अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे स्वागत केले आहे.