Home Breaking News •  मुल नगर परिषद निवडणूक • प्रभाग क्रमांक 4 मधून काँग्रेस पार्टीच्या...

•  मुल नगर परिषद निवडणूक • प्रभाग क्रमांक 4 मधून काँग्रेस पार्टीच्या वतीने उज्वला कामडी व राकेश रत्नावार निवडणूक मैदानात ! • दोन्ही उमेदवारांचा प्रचार घरोघरी जाऊन ! • मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!

120

•  मुल नगर परिषद निवडणूक
• प्रभाग क्रमांक 4 मधून काँग्रेस पार्टीच्या वतीने उज्वला कामडी व राकेश रत्नावार निवडणूक मैदानात !
• दोन्ही उमेदवारांचा प्रचार घरोघरी जाऊन !
• मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुल : किरण घाटे चंद्रपूर

जिल्हा परिषद,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,मुल नगर परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष रावत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीने मूल नगर परिषद निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून उच्च शिक्षित एकता प्रशांत समर्थ यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
दहाही प्रभाग मध्ये पार्टीने(अ व ब गटात) नगरसेवक पदासाठी आपले उमेदवार उभे केले आहे.या सर्व उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असून प्रभाग 4 मध्ये राकेश रत्नावार व उज्वला कामडी ह्या घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत.त्यांना मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग 6 मध्ये मध्ये काँग्रेसच्या नलिनी आडपवार व विवेक मुत्यलवार यांनी सध्या तरी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असल्याचे चित्र दिसत आहे.काॅंग्रेस उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाचे दिग्गज नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते दिवसरात्र अथक मेहनत घेत आहेत.