Home Breaking News आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त ‘ही’ कागदपत्रे आवश्यक,UIDAI चा मोठा बदल

आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त ‘ही’ कागदपत्रे आवश्यक,UIDAI चा मोठा बदल

55

आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त ‘ही’ कागदपत्रे आवश्यक,UIDAI चा मोठा बदल

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

▪️ भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने आधार कार्डातील नावनोंदणी आणि दुरुस्तीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.

▪️ नवीन नियमांनुसार,
🔹 ओळख
✔️ पत्ता
✔️ नातेसंबंध
✔️ जन्मतारीख

या गोष्टी सिद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांची यादी अद्ययावत करण्यात आली आहे.

▪️ सदर नवीन यादी लहान मुले, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांसाठी लागू असेल.

▪️ नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
🔸 पासपोर्ट
🔸 पॅन कार्ड
🔸 मतदार ओळखपत्र
🔸 ड्रायव्हिंग लायसन्स
🔸 सरकारी ओळखपत्र
🔸 विवाह प्रमाणपत्र

▪️पत्ता बदलण्यासाठी लागणारे दस्तऐवज
🔸 पासपोर्ट
🔸 बँक पासबुक/बँक स्टेटमेंट
🔸 वीज-पाणी-गॅसची बिले
🔸मतदार ओळखपत्र
🔸 रेशन कार्ड
🔸 हाऊस टॅक्स/प्रॉपर्टी टॅक्स पावती
🔸 भाडेकरूंसाठी– भाडेकरार आणि पोलीस पडताळणी किंवा नोटरीची प्रत.

जन्मतारीख कशी अपडेट करावी?
✔️ जन्म प्रमाणपत्र
✔️ पासपोर्ट
✔️ १०वी/१२वी ची मार्कशीट
✔️ फिजिकल पॅन कार्ड
✔️ सरकारी ओळखपत्र

▪️आधार अपडेटची नवीन आणि मोठी सुविधा
• यूआयडीएआयच्या नवीन नियमांनुसार, आता एकाच कागदपत्रात फोटो, नाव आणि पत्ता हे तिन्ही तपशील असल्यास, ते आधार अपडेटसाठी पुरेसे मानले जाईल.
• पूर्वी प्रत्येक तपशिलासाठी वेगवेगळे पुरावे सादर करणे आवश्यक होते.
आता एकाच कागदपत्राद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येईल, ज्यामुळे नाव बदलणे, पत्ता सुधारणे, जन्मतारीख अपडेट करणे किंवा नातेसंबंध जोडणे हे सर्व काम सोपे झाले आहे.

▪️ या गोष्टी लक्षात ठेवा▪️
अपडेटसाठी दिलेले सर्व दस्तावेज मूळ आणि स्पष्ट असावेत.
कोणत्याही प्रकारची खाडाखोड, ओव्हररायटिंग किंवा बदल आढळल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

आधारमधील काही माहिती मर्यादित वेळाच बदलण्याची परवानगी आहे.
नाव फक्त दोनदा, तर जन्मतारीख आणि लिंग फक्त एकदाच बदलता येते.

ज्या तपशिलात बदल करायचा आहे, त्याचे योग्य दस्तऐवज तयार ठेवा. तुमच्या जवळच्या आधार नोंदणी/अपडेट केंद्रावर जा किंवा myAadhaar पोर्टलद्वारे ऑनलाइन प्रक्रिया तपासा. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर नवीन आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल.