Home Breaking News #Chandrapur • विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना...

#Chandrapur • विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

139

#Chandrapur
• विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विदर्भ किसान मजदूर काँग्रेसतर्फे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व युवा नेते राहुलबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत अनुशासनबद्ध आणि श्रद्धाभावाने पार पडला.

या प्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पार्पण करीत भारतरत्न डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येतात. दलित, शोषित, पीडित घटकांच्या हक्कांसाठी आजीवन लढा देत सामाजिक न्यायाची भक्कम पायाभरणी करण्याचे महान कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. अस्पृश्यता निर्मूलन, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, समानतेच्या मूल्यांची रुजवण आणि बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार हे त्यांचे अतुलनीय योगदान देश आजही स्मरतो.

“डॉ. बाबासाहेबांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य झोकून दिले. संविधानाच्या माध्यमातून गावापासून देशापर्यंत विकासाचा मार्गदर्शक आराखडा दिला. त्यांचे विचार आपण हृदयात जोपासून प्रत्यक्षात उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे मत नरेशबाबू पुगलिया यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे जिल्हा महासचिव व माजी नगरसेवक अशोक नागापूरे, शहराध्यक्ष देवेंद्र बेले, चंद्रशेखर पोडे, सुधाकरसिंग गौर, माजी उपाध्यक्ष अरुण बुरडकर, श्रीनिवास पारनंदी, विनोद पिंपळशेंडे, स्वप्नील तिवारी, पृथ्वी जंगम, बाबा मुन, सुरेश बोडणे, हेमंत आक्केवार, शंकर बल्लेपवार, सुनिल बकाली, प्रशांत कस्तुरे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.