Home Breaking News #Ballarpur • बल्लारपूरमध्ये ‘निकोटीन अनॉनिमस’चा शुभारंभ

#Ballarpur • बल्लारपूरमध्ये ‘निकोटीन अनॉनिमस’चा शुभारंभ

95

#Ballarpur
• बल्लारपूरमध्ये ‘निकोटीन अनॉनिमस’चा शुभारंभ

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनातून मुक्ती मिळवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या ‘निकोटीन अनॉनिमस’ या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेच्या कार्याचा शुभारंभ बल्लारपूर येथे करण्यात येत आहे. यानिमित्ताने शनिवार, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत आयडियल इंग्लिश स्कूल, कला मंदिर, बल्लारपूर येथे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बल्लारपूर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून अनेक नागरिक या व्यसनातून बाहेर पडू इच्छितात. मात्र योग्य मार्गदर्शन व सहकार्याच्या अभावामुळे त्यांना यश मिळत नाही. अशा व्यसनग्रस्त व्यक्तींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना निकोटीन अनॉनिमस संस्थेमार्फत विनामूल्य मार्गदर्शन व मानसिक आधार दिला जाणार आहे.

निकोटीन अनॉनिमस ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्था असून जगभरातील हजारो ठिकाणी नियमित बैठकांच्या माध्यमातून तंबाखूजन्य व्यसनमुक्तीसाठी प्रभावी कार्य करत आहे. तंबाखू सोडण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉ. रजनी हजारे तसेच नाशिक येथील डॉ. प्रमोद महाजन उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना तंबाखूजन्य व्यसनमुक्तीबाबत सखोल व उपयुक्त मार्गदर्शन करणार आहेत.

बल्लारपूर परिसरातील नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची व सकारात्मक संधी असून अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.