भस्त्रिका प्राणायाम
सर्वप्रथम आपण प्राणायाम करताना बसण्याची पद्धत जाणून घेऊयात!
आपण प्राणायाम करताना चार आसनात बसू शकतो.
(पहिला – सुखासन ,दुसरा – सिद्धासन, तिसरा – पद्मासन आणि चौथा- दंडासन ) आपण कुठलेही एक आसन लावू शकतो.
सर्वप्रथम आपण प्राणायाम बद्दल जाणून घेऊ ,प्राणायाम याचा अर्थ किंवा व्याख्या सांगायची म्हणजे श्वास आणि प्रश्वासच्या गतीवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच प्राणायाम!
आता श्वास आणि प्रश्वास म्हणजे काय तर श्वास म्हणजे श्वास आत घेणे आणि प्रश्वास म्हणजे श्वास बाहेर सोडणे.
आता आपण आपल्या पहिल्या प्राणायाकडे वळू म्हणजेच भस्त्रिका प्राणायाम!
सर्वप्रथम आपण याची विधी जाणून घेऊ डोळे बंद करून पाठ, मान आणि कमर सरळ ठेवणे आणि दीर्घ श्वास घेणे, दीर्घ श्वास सोडणे म्हणजेच एका मिनिटाला चार श्वास पंधरा सेकंद घेणे आणि पंधरा सेकंद सोडणे ही झाली हळुवार पद्धत ,हीच क्रिया आपण जलद गतीने करू शकतो म्हणजे श्वास हा जलद गतीने छातीपर्यंत घेणे आणि लगेच छातीतून बाहेर काढणे म्हणजेच एका मिनिटाला शंभर वेळा श्वास आणि प्रश्वास ही क्रिया जलद गतीने आत आणि बाहेर करणे हीच झाली भस्त्रिका प्राणायाम ची विधी…..
या प्राणायामाचे फायदे काय आहे हे जाणून घेऊयात……
रक्तदाब नियंत्रित राहतो आणि श्वसन मार्ग स्वच्छ होतात, शरीरात ऊर्जेचा स्तर वाढतो ,थकवा दूर होतो, तणाव चिंता दूर होते ,एकाग्रता वाढते पचनक्रिया सुधारते, पुरुषांची छाती भरदार होते आणि स्त्रियांचे वक्ष हे त्यांच्या शरीराच्या रचनेनुसार सुडोल होतात.
भस्त्रिका प्राणायाम करताना काही काळजी घेण्यासारख्या गोष्टी खालील प्रमाणे आहेत….
*टीप*
ज्यांना श्वसन संबंधी काही समस्या असतील त्यांनी हा प्राणायाम अगदी हळुवार आणि सहजरित्या गुरूच्या मार्गदर्शनाने करावा. म्हणजेच आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊन आपले शरीर हे मजबूत होईल.
🔲सौ.वैजयंती विकास गहूकर
योग शिक्षिका चंद्रपूर





