Home Breaking News #Mul • मुल नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रा.किरण कापगते पराभूत :...

#Mul • मुल नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रा.किरण कापगते पराभूत : काँग्रेसच्या एकता समर्थ बहुमताने विजयी! • शहरात निघाली भव्य विजयी रॅली! काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल-केली फटाक्यांची आतिषबाजी! • काँग्रेसच्या विजयोत्सावात अनेक झाले सहभागी!

213
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

#Mul

• मुल नगर परिषदेच्या निवडणुकीत
भाजपच्या प्रा.किरण कापगते पराभूत : काँग्रेसच्या एकता समर्थ बहुमताने विजयी!
• शहरात निघाली भव्य विजयी रॅली!
काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल-केली फटाक्यांची आतिषबाजी!
• काँग्रेसच्या विजयोत्सावात अनेक झाले सहभागी!

मुल (चंद्रपूर)
🔳किरण घाटे🔳
मुल नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला पार पडली.
आज या निवडणुकीचा निकाल घोषीत झाला.दरम्यान तहसिल कार्यालयात पार पडलेल्या मतमोजणीत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उच्च शिक्षित एकता प्रशांत समर्थ यांनी भाजपच्या उमेदवार प्रा.किरण कापगते ह्यांचा दारुण पराभव केला .एकता समर्थ या निवडणुकीत बहुमताने विजयी झाल्या!
मुल मधील निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना सर्वाधिक पसंती दिली असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले.
या निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक पदासाठी अठरा उमेदवार विजयी झाले तर भाजपला अवघ्या दोन जागेवर समाधान मानावे लागले.
शहरातील विकासाच्या मुद्यावर काँग्रेसने उमेदवारांना निवडणूक मैदानात उतरविले होते.सुरुवाती पासूनच काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली होती.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागात जीव ओतून
” घर ते घर “असा प्रचार करुन मतदारांचा विश्वास संपादन केला होता.परिमामे काँग्रेसला या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले.
भाजपने देखील आपल्या उमेदवारांच्या प्रचारात कुठलीही कमतरता सोडली नव्हती .पण दोन नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांना सोडता अन्य उमेदवारांना चक्क मतदारांनी नाकारल्याचे चित्र आज निकाल घोषीत झाल्यानंतर दिसून आले.कांग्रेसच्या वतीने खा.प्रतिभा धानोरकर,आमदार विजय वडेट्टीवार,व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष सिंह रावत यांनी उमेदवारांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली तर
विजय चिमड्यालवार,घनश्याम येनूरकर,प्रकाश कागदेलवार ,राजेंद्र कन्नमवार,गुरुदास गुरनुले, सुनिल शेरकी, रुपाली संतोषवार ,डॉ विनोद चौधरी, डॉ.मार्टीन अझिम, नंदू कागदेलवार,प्रेम चुगाणी दिनेश गोयल, कैलास चलाख, गंगाधर कुनघाडकर, गुरुदास चौधरी बंडूभाऊ गुरनुले,गुलाबखाॅ पठाण,शाम उराडे ,भाग्यवान खोब्रागडे,वनिता बुटले,दर्शना भडके, विठ्ठल एडनतूलवार फरजान शेख ,दत्तात्रय समर्थ ,अधिवक्ता हिमानी वाकुडकर व काँग्रेस पार्टीच्या जेष्ठ नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
काँग्रेसचे विजयी उमेदवार असे
🔲नगराध्यक्ष पदासाठी -एकता प्रशांत समर्थ
🔲नगरसेवक पदासाठी अनुक्रमे –
कु.काजल दिपक धारणे ,प्रशांत विलास समर्थ,तुकाराम पुंडलिक गुरनूले,शालू किसन शेलकी,मिथून प्रकाश गद्देवार, राकेश रत्नावार, उज्वला अंकुश कामडी,रितीक दिनेश गोयल ,विवेक मुत्यलवार, नलिनी दिनेश आडपवार, अशोक येरमे, समिक्षा कडस्कर अतुल गोवर्धन, ज्योति चटारे, ललिता सुरेश फूलझेले,विलास कागदेलवार, सुशिला खोब्रागडे, राहुल प्रेमलवार
———————————————-
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष रावत यांच्या नेतृत्वाखाली मुल नगर परिषदेची काँग्रेस उमेदवारांनी निवडणूक लढविली होती.