Home Breaking News प्रेमभंग

प्रेमभंग

177
Oplus_16908288

*प्रेमभंग*

भुलली रूपाला त्याच्या
होता राजा स्वप्नाचा
होईल मी राणी त्याची
ध्यास माझ्या मनाचा…..1

घेतल्या होत्या आणाभाका
जीवनात सोबतीच्या
भंगले स्वप्न सारे
पाऊस नयनात आसवांचा….2

दुरुनी आता वाटे
ओसाड वाटा प्रेमाच्या
थट्टा झाली जीवाची
डाव मोडला प्रीतीचा….3

झाली प्रेम दिवाणी
जपता माळ प्रितीची
मंदिरात आता प्रेमाच्या
मूर्ती नाही कुणाची…..4

⬜सौ.वैजयंती विकास गहूकर
⬜⬜कवयित्री चंद्रपूर ⬜⬜