
#chandrapur
• वृध्द कलावंतांची धडपड अद्याप संपलेली नाही!
• सारिका उराडेंचे प्रयत्न सुरूच
• गौतम तोडेंच्या नेतृत्वात चंद्रपूर
जिल्हाधिकाऱ्यांना दिले होतेय या पूर्वीच निवेदन
चंद्रपूर : किरण घाटे
किमान पाचशे कलावंतांना मानधन मंजूर करण्यात यावे , कलावंताची जीवनशैली लक्षात घेता मानधन करीता त्यांची वयोमर्यादा किमान 40वर्ष करण्यात यावी , अपंग, विधवा, कलावंतांना वयाची अट नसावी व सन 1954-55 पासून सुरू असलेल्या यादीत बदल करून वृद्ध कलावंतांना मानधनाचा लाभ शासनाकडून देण्यात यावा अश्या मागण्यांचे एक लेखी निवेदन काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.प्रा.अशोक उईके व जिल्हाधिकारी विनय गौडा यांना आपली व्यथा ऐकिवत अखिल भारतीय लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या संस्थापक अध्यक्ष सारिका उराडे यांनी सादर केले होते.या वेळी प्रामुख्याने आरपीआयचे आठवले गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, गौतम भसारकर, चंद्रशेखर राऊत, यशवंत उराडे,राशी उराडे, कुंदा बोरकर, काशिनाथ भोयर, निर्मला लांजेवार, भैय्यालाल रामटेके, सुरेखा पोपडे, निर्मला अवगाना,लता लोडे, राजेंद्र पाटील,पार्वता ठिकरे, संगिता जांभूळकर,मंदा करकाडे,नथ्थुजी ठाकरे,गयना रामटेके, मंगला करकाडे यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडों वृध्द कलावंत उपस्थित होते.परंतु अद्याप त्यांच्या निवेदनाची दखल शासन स्तरावर घेण्यात आली नाही.त्यामुळे साहजिकच चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील लोक कलावंतांच्या बोलण्यातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.चंद्रपूर लोककलावंतच्या प्रमुख सारिका उराडे यांचा या मागणीच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे एकंदरीत दिसून येते.परंतु त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश प्राप्त झाले नाही.
