
#Rajura
• काँग्रेस-शेतकरी संघटनेचे राजूरा नगर परिषदेवर वर्चस्व
नगराध्यक्ष पदासाठी अरुण धोटे विजयी!
राजुरा- विशेष प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त नगर विकास आघाडीने राजूरा नगरपरिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस-शेतकरी संघटना आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण रामचंद्र धोटे यांनी भाजपचे उमेदवार राधेश्याम लक्ष्मीनारायण अडाणीया यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला.आहे अरुण धोटे यांना ९०११ मते मिळाली, तर राधेश्याम अडाणीया यांना ६२७८ मते मिळाली.
नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीतही बहुतांश प्रभागांत काँग्रेस-शेतकरी संघटना आघाडीने घवघवीत यश प्राप्त केले आहे.
नगर विकास आघाडी १६ जागांवर विजयी, भाजपा ४ जागांवर तर १अपक्ष उमेदवार विजयी झाला.
🔲⬜🔲भारत रोहणे व जुबेर शेख यांच्यात समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीचा प्रयोग करावा लागला. त्यात जुबेर शेख विजयी ठरले.
निवडणूक निकालाची घोषणा झाल्यानंतर शहरात काँग्रेस-शेतकरी संघटना आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मतदारांनी विकास, पारदर्शकता आणि स्थानिक प्रश्नांना कौल दिल्याचे एकंदरीत या निकालावरून दिसून आले.
———————————————
*”ते” दोघेही विजयी*
राजुरा नगर विकास आघाडीतून सिद्धार्थ पथाडे व गीता सिद्धार्थ पथाडे हे दोघेही पती पत्नी विजयी झाले आहेत.
———————————————
ईश्र्वर चिठ्ठीचा प्रयोग
प्रभाग क्रमांक १० मधे अपक्ष उमेदवार जुबेर शेख व नगर विकास आघाडीच्या भारत रोहने यांना ४०६ समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीचा प्रयोग करावा लागला त्यात जुबेर शेख (अपक्ष उमेदवार )विजयी झाले
———————————————
“ते “दोघेही पराभूत!
भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष सुरेश रागीट व भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्षा माया धोटे या दोघांनीही तिसऱ्या वेळी निवडणूक लढवली परंतु त्यांना या निवडणुकीत पराजयाचा सामना करावा लागला.
———————————————
काँग्रेसचे अरुण धोटे तिसऱ्यांदा बनले नगराध्यक्ष
जनतेमधून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा मान काँग्रेसचे अरुण धोटे यांनी मिळविला आहे ते तिसऱ्यांदा राजूरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष बनले आहे.
