
• सहज सुचलं गृपला सहभागी झालेल्या सर्व नवोदित सदस्यांचे केले मायाताई कोसरे यांनी अभिनंदन!
चंद्रपूर – विशेष प्रतिनिधी
गत 11अकरा वर्षांपासून नित्य सुरू असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृपला या आठवड्यात रुजू झालेल्या सर्व नवोदित सदस्यांचे मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांनी एका पाठविलेल्या व्हाॅटसअप संदेशातून अभिनंदन केले आहे.
◼️सध्या कोसरे ह्या आफ्रिका मध्ये वास्तव्याने असून त्या अधून मधून ह्या गृपचा आढावा सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांच्या कडून भ्रमणध्वनीच्या माध्यमातून जाणून घेतात.
◼️त्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मायदेशी परतत असल्याचे अधिवक्ता मेघा धोटे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काल चंद्रपूर मुक्कामी सांगितले.
