Home Breaking News ⬜🟡संगीत -गायन- साधना🟠

⬜🟡संगीत -गायन- साधना🟠

68
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

⬜🟡संगीत -गायन- साधना🟠

संगीत गायन साधनेसाठी सूर, ताल, आलाप, लय या साऱ्यांची आवशक्यता असते..
भारतीय संगीत गायनाची लोकप्रियता संपूर्ण विश्वात आहे. संगीत गायन लोकप्रिय करण्यात महाराष्ट्रातील पंचरत्नांचा सिंहाचा वाटा आहे.
(मंगेशकर घराणे )वैविध्यपूर्ण गाण्यांनी रसिक मनावर राज्य केलयं . रसिक हृदयावर राज्य करणारे गायक गायिका यांनी श्रोत्यांच्या जीवनात गाण्याने आनंद निर्माण केले.
बालपणापासून संगीत साधनेची ज्यांना आवड असते त्यांच्या अंगी असलेले चांगले गुण त्यांच्या वागण्या बोलण्यातून आढळून येते. आणि नंतर त्यांचे नाते जाणकार व्यक्तींशी जुळते त्यानंतर ते पारंगत होतात जसे सूर्य देवाला सांगावे लागत नाही उगवला की आपोआप पृथ्वीला प्रकाशमान करतो.. त्याप्रमाणे छोटे छोटे बालक टि. व्ही च्या माध्यमातून आपल्या आवाजानी मंत्रमुग्ध करून रसिकांच्या मनावर एक उत्तम छाप पाडतात.बालपणापासून लागलेला हा एक छंद असतो. प्रत्येकाला आपले कॅरीअर करायसाठी मार्ग असतो. सुरेल आवाज ही एक ईश्वरी देणगीच असते. हा अतुलनीय अनुभव असतो. आणि भविष्य घडले की आयुष्य खरोखर धन्य झाल्यासारखे वाटते. आणि सरळसोट मार्गाने कौतुकाची थाप मिळते…
संगीत गायन साधना भजन, कीर्तन, सिनेमातली हिंदी मराठी गाणी, नाटक असे कित्येक संगीत बद्ध गाणे असतात. या माध्यमातून एक कमावण्याचा उपक्रम साध्य करू शकतात. संगीतातून मोठे गायक गायिका निर्माण झाल्यात. संगीत गायन असते संजीवनी देणारे गायन, निसर्ग वर्णन मन मोहविणारं गायन, ऐतिहासिक गायन,पोवाडा, शूर विरांची आठवण गायन,बालगीत… असे कित्येक संगीत गायन साधना आपल्यात रुजलेले असतात.ते आत्मसात करावे….

सौ. शैला चिमड्यालवार
सहज सुचलं काव्यकुंज सावली