
एकता समर्थ व नलिनी आडपवार यांचे केले ज्योति घाटे यांनी अभिनंदन!
चंद्रपूर : विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत उच्च शिक्षित एकता प्रशांत समर्थ ह्या नगराध्यक्ष पदासाठी तथा नलिनी दिनेश आडपवार ह्या नगरसेवक पदासाठी विजयी झाल्याबद्दल चंद्रपूर संस्कार पत संस्थेच्या संचालिका ज्योति किरण घाटे यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.
