#Savli
• सावलीत पार पडला शेतकरी मेळावा तथा सन्मान सोहळा !
• कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती
सुवर्ण भारत: किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)
सावली(-चंद्रपूर) : रासायनिक खतामुळे जमिनीची सुपीकता कायमस्वरूपी टिकून राहत नाही.त्यामुळे जमिनीची पोत बिघडते.पिकांची जोमाने वाढ होत नाही.उत्पादनात घट येते.जमिनीची सुपीकता तयार व्हायला अनेक वर्षे लागतात.शेंद्रीय खताने सुपीकता वाढून पिकाच्या उत्पादनात वाढ होते.त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑर्गनाईक शेती करावी असे प्रतिपादन चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकितसिंग यांनी दोन दिवसीय सुरू असलेल्या कृषी मेळाव्या प्रसंगी केले .
येथील विश्वशांती विद्यालयाच्या भव्य प्रांगणात लोकनेते स्व .वामनराव गड्डमवार यांच्या जयंती निमित्ताने आयोजित शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनिल बल्लमवार यांनी विभूषीत केले होते.कार्यक्रमाच्या मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकितसिंग ,गट विकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार , संदीप गड्डमवार, राजबाळ संगीडवार ,उपाध्यक्ष अनिल स्वामी नरेश सुरमवार, विजय कोरेवार,सुशील नरेड्डीवार, नितीन गोहणे, संजय गड्डमवार,सुनील नरेड्डीवार उपस्थित होते.या वेळी
पुलकितसिंग यांच्या हस्ते प्रगतीशील शेतकरी संजय तुळशीराम मडावी ,रुमजी गिरमाजी भोयर, देविदास सुरेश चौधरी
यांचा सत्कार करण्यातआला.पुढे बोलताना ते म्हणाले की शेती करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.त्यामुळे उत्पादनात वाढ नक्कीच होईल.हा शेतकरी मेळावा त्यासाठीच घेण्यात आलाआहे. हंगामानुसार पिकांचा आराखडा तयार करा. हिरवळीचे पिके घ्या. हिरवळीच्या पिके फुलोऱ्यावर असतांना नांगरटी करून जमिनीत गाडावी.त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. रासायनिक खतांचा वापर कमी करावा.त्यामुळे दुष्परिणाम पिकावर दिसून येतात.अधिक उत्पादन वाढीसाठी शेंद्रीय खताची गरज महत्त्वाची असते.शेतकऱ्यांनी कृषी विषयावर मार्गदर्शन करणाऱ्या कृषी तंज्ञाशी नेहमी संपर्कात राहावे असे ही पुलकितसिंग यांनी यावेळी सांगितले.

