राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
चंद्रपूर -किरण घाटे
भद्रावती तहसील कार्यालयाच्या वतीने भद्रावती तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार बालाजी कदम हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे भद्रावती तालुकाध्यक्ष बालाजी दांडेकर, नायब तहसिलदार मधुकर काळे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शक पुरुषोत्तम मते, प्रा. गोपाल घुमे, जिल्हाउपाध्यक्ष वामन नामपल्लीवार, विदर्भ प्रांत कार्यकारणी सदस्य वसंत वराटे, प्रचार आयाम प्रमुख अतुल कोल्हे, प्रवीण चिमुरकर, वतन लोने उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार कदम यांनी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यात येत असून ग्राहकांविषयांचे मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे काही तक्रारी असल्यास नागरिकांनी भद्रावती ग्राहक पंचायतीशी संपर्क साधून आपल्या समस्यांचे निराकरण करावे असे आवाहन त्यांनी तालुक्यातील नागरिकांना केले.
कार्यक्रमांचे संचालन पुरवठा निरीक्षक अधिकारी हर्षा दुधे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार महसूल कनिष्ठ लिपिक रति मस्के यांनी मानले.कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तथा तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

