#rajura
• राजुरा -तेलंगाना मार्गावर एका धावत्या कारला अपघात
◾पुलावरून कार खाली कोसळली
◾4 जण ठार तर 5 गंभीर जखमी
◾जखमींवर चंद्रपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू
राजुरा (चंद्रपूर)-किरण घाटे
एका धावत्या कारला अपघात झाल्याची दूदैवी घटना घडली.
यात चार जणांचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी असल्याचे वृत्त आहे
या बाबतीत असे कळते कि तेलंगाना राज्यातील कागजनगर येथील निजामुद्दीन कॉलनीतील रहिवासी असलेल्या मृतक व जखमी हे सर्व नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बहिणीची प्रकृती बघायला दि. २४ डिसेंबरला किरायाने गाडी करून गेले होते. बहिणीची प्रकृती बघून ते सर्व दि.२५ डिसेंबरला नागपूर येथून कागजनगर कडे आपल्या घरी परतत असताना राजुरा -तेलंगाना मार्गावर सोंडो गावा जवळील पुलावरून रात्री एक वाजताच्या दरम्यान गाडी पुलावरून खाली कोसळली. यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.
तर अन्य पाच जणांवर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात एकाच घरातील माय लेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये (आई) सलमा बेगम , (मुलगी)अक्सा शबरीन या मायलेकींचा समावेश आहे.तर अफजल बेगम , साहिरा बेगम
यांचा देखील समावेश आहे .
गंभीर जखमी असलेल्या नुसरत बेगम , नजहत बेगम ,शाहीन निशा अब्दुल अरहान व गाडी चालक अब्दुल रहमान यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
आर्टिगा गाडी क्रमांक TS 02 EN5544या क्रमांकाच्या गाडीला भीषण अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत सदरहु अपघातातील जखमी व मृतांना राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
गाडी चालक अब्दुल रहमान यांच्यावर २८१,२२५ (ब),१०६ (१), BNS सह कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे .पुढील चौकशी राजुरा पोलिस करीत आहे.
———————————————
◾भीषण अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू !
मृतक सलमा बेगम (४५) ही गृहिणी होती. तर अक्सा शबरीन (१२) ही इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. मृत्यू पश्चात कुटुंबात वडील ऑटो चालक असून एक भाऊ बी. कॉम. द्वितीय वर्षात शिकत आहे.
बहिणीची प्रकृती बघून नागपूर वरून घरी परत येताना काळाने अचानक घाला घातला त्यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
◾ढिसाळ नियोजनाचे ठरले
“ते “बळी !
गेल्या अनेक दिवसांपासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम दिवस रात्र सुरू आहे. परंतु कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनाचे ते प्रवासी बळी ठरले असल्याचे नागरिकांत सर्वत्र बोलल्या जात आहे.

