Home Breaking News अन्यायग्रस्त शेतकऱ्यासाठी आक्रोश मोर्चा! ◾येत्या 3 जानेवारीला भव्य मोर्चा ◾नागभीड बंदचीही दिली...

अन्यायग्रस्त शेतकऱ्यासाठी आक्रोश मोर्चा! ◾येत्या 3 जानेवारीला भव्य मोर्चा ◾नागभीड बंदचीही दिली हाक

95
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

• अन्यायग्रस्त शेतकऱ्यासाठी आक्रोश मोर्चा!
◾येत्या 3 जानेवारीला भव्य मोर्चा
◾नागभीड बंदचीही दिली हाक

चंद्रपूर -किरण घाटे-

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी तसेच माणुसकीला काळीमा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर या गावी नुकतीच घडली.
रोशन कुडे या तरुण शेतकऱ्याला अवघ्या एक लाख रुपयाच्या कर्जापोटी अवैद्य सावकारांनी तब्बल 74 लाख रुपयांची परतफेड करावी लागली .कर्जाच्या अमानुष तगाद्यामुळे शेती ,वाहने ,सोने विकल्यानंतर अखेर शेतकऱ्यावर स्वतःची किडनी विकण्याची पाळी सावकारांनी आणली.
रोशन कुडे या तरुण शेतकऱ्यावर जो अन्याय झाला त्यास किडनी विकावी लागली त्या दोषी अवैध सावकारावर मोका अंतर्गत कारवाई करावी. त्याची गेलेली संपत्ती शासनाने परत मिळवून द्यावी मायक्रो फायनान्स कंपन्या द्वारे शेतकऱ्यांशी,विविध बचत गटांशी करीत असलेला लुटीचा धंदा बंद करण्यात यावा.यासह अन्य मागण्यांसाठी बच्चू कडू , शेतकरी संघटना, व सामाजिक संघटना यांच्या नेतृत्वात दि. ३ जानेवारीला सकाळी ११ वाजता मिंथूर येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्याच्या निवासस्थाना पासून ते नागभीड तहसील कार्यालया पर्यंत शेतकऱ्यांचा पायदळ आक्रोश मोर्चा निघणार आहे.दरम्यान याच दिवशी नागभीड शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली असल्याचे समजते.
नागभीडचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदनाच्या माध्यमातून शेतकरी जन आक्रोश मोर्चाची माहिती निमंत्रक विनोद झोडगे व राहुल पांडव यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी
होणाऱ्या या विराट आक्रोश पायदळ मोर्चात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी जन आक्रोश मोर्चा शेतकरी समन्वय समितीने केले आहे.