Home Breaking News • रंज्जू दिलीप मोडक यांचे चंदा कामडी यांच्यासह अनेकांनी केले अभिनंदन! ...

• रंज्जू दिलीप मोडक यांचे चंदा कामडी यांच्यासह अनेकांनी केले अभिनंदन! • मोडक यांची सहज सुचलंच्या संयोजिकापदी नियुक्ती!

184

• रंज्जू दिलीप मोडक यांचे
चंदा कामडी यांच्यासह अनेकांनी केले अभिनंदन!

• मोडक यांची सहज सुचलंच्या संयोजिकापदी नियुक्ती!

सुवर्ण भारत:किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर: कला,क्रीडा,साहित्यिक, शैक्षणिक संगीत व सामाजिक क्षेत्रातील नवोदितांना सदैव प्रोत्साहित करणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका पदी चंद्रपूरच्या योगशिक्षिका रंज्जू दिलीप मोडक यांची सलग चवथ्यांदा नियुक्ती झाल्याबद्दल मुलच्या समाजसेविका चंदा कामडी यांनी मोडक यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.

सामाजिक क्षेत्रात रंज्जू मोडक यांची कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेत गत वर्षी मूल नगरीच्या पत्रकार भवनात लोकहितच्या वतीने देण्यात येणारा महिला कर्तृत्ववान सन्मान पुरस्कार त्यांना बहाल झाला आहे.
या शिवाय विदर्भातील अनेक विविध सामाजिक संघटना व सामाजिक संस्थांचे अनेक कर्तृत्ववान सन्मान पुरस्कार त्यांच्या नावे आहेत.

यंदा वणीत झालेल्या एका कार्यक्रमात प्रख्यात कवयित्री रजनी पोयाम यांनी आपल्या संस्थेच्या वतीने त्यांना अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

रंज्जू मोडक यांच्या नियुक्तीचे स्वागत व अभिनंदन !
सहज सुचलं नागपूरच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे,
राजूराच्या अधिवक्ता मेघा धोटे,सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार,चंद्रपूरच्या सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, भद्रावतीच्या रजनी रणदिवे तसेच पथ्रोटच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे यांनी रंज्जू दिलीप मोडक यांची सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका पदी चवथ्यांदा नियुक्ती केल्याबद्दल अनेकांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.
दरम्यान चंद्रपूरच्या नवोदित कवयित्री प्रियंका बेन्द्रे,अभियंता प्रियंका गायकवाड, मधुर आवाजाच्या गायिका रश्मि हिवरे, प्रख्यात चित्रकार रश्मि पचारे, सुपरिचित रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे, आर्किटेक्ट शिवानी प्रमोद झाडे, योगशिक्षिका वैजयंती गहुकर, ठाण्याच्या नामवंत कवयित्री कु.मंगल मिसाळ,कवयित्री रोहिणी पराडकर, समाजसेविका वंदना बरडे,कलावंत मनिषा मडावी, गडचिरोलीच्या ॲड.कविता मोहोरकर,नाट्य कलावंत राशी उराडे,अधिवक्ता हिमानी वाकुडकर, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना चावरे, अर्चना समर्थ, पुण्याच्या पत्रकार कु.स्नेहा मडावी,फर्जना शेख, समता बन्सोड या शिवाय नलिनी आडपवार श्रध्दा परिमल,अधिवक्ता सारिका टेंभरे,नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्या चैताली आतराम, चंद्रपूरच्या समाजसेविका सारिका उराडे, पूनम मडावी,प्रांजू मखरे भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी यांनी रंज्जू मोडक यांचे अभिनंदन केले आहे.