#Bhadravti
• गावातीलच सुशिक्षीत बेरोजगारांच्या हातांना कामे द्या !
• प्रकलपग्रस्त युवा संघर्ष समितीने दिले मागणीचे निवेदन
चंद्रपूर ◾विशेष प्रतिनिधी ◾
भद्रावती तालुक्यात बरांज येथे केपीसीएल कंपनीची एक कोळसा खाण आहे. परंतु
कंपनीच्या माध्यमातून निघणारी विविध कामे गावातील होतकरु व सुशिक्षीत तरुणांना मिळत नाही. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. ही समस्या लक्षात घेत गावातील सुशिक्षित तरुणांना व बचत गटांना ती कामे देण्यात यावी अशी मागणी चेकबरांज येथील प्रकल्पग्रस्त युवा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केपीसीएल कंपनीला एका लेखी निवेदनातून केली आहे.
आठ दिवसांत यावर विचार न केल्यास संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा सदरहू निवेदनातून देण्यात आला आहे. गावात सोसायट्या व अनेक बचतगट कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून कंपनीतील निघणारी कामे ही गावातीलच सुशिक्षित तरुणांना द्यावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
निवेदन सादर करताना संघर्ष समितीचे पदाधिकारी व अन्य सदस्य उपस्थित होते.

