Home Breaking News #Gadchiroli • गडचिरोली -रिंगरोडला मंजूरी द्या -अधिवक्ता प्रणोती निंधोरकरांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

#Gadchiroli • गडचिरोली -रिंगरोडला मंजूरी द्या -अधिवक्ता प्रणोती निंधोरकरांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

59
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

#Gadchiroli
• गडचिरोली -रिंगरोडला मंजूरी द्या -अधिवक्ता प्रणोती निंधोरकरांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सुवर्ण भारत : किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)

गडचिरोली : गडचिरोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अधिवक्ता प्रणोती निंधोरकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाची धुरा हातात घेतली आहे .
त्यांनी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच सदिच्छा भेट घेत त्यांनी शहरातील अतिशय महत्वाच्या प्रश्नांवर त्यांच्याशी इंतभू चर्चा केली
यावेळी नगराध्यक्ष निंबोरकर यांनी गडचिरोली शहरासाठी रिंगरोडची तातडीची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांना मुख्यतः सांगितले.
सतत वाढत असलेली वाहतूक आणि शहरातील अरूंद रस्त्यांमुळे निर्माण होणारा त्रास लक्षात घेता गडचिरोलीसाठी रिंगरोडची आवश्यक असल्याचे त्यांनी पटवून दिले.
या साठी तातडीने मंजूरी देऊन पुढील पावले उचलावीत, अशी मागणी देखील त्यांनी ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली
रिंगरोड व्यतिरिक्त शहरातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, निधी उपलब्धता तसेच नागरिकांच्या नित्य समस्यां या विषयांवरही अधिवक्ता निंबोरकर यांनी चर्चा केली. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक ते सर्व पाठबळ देण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली .भारतीय जनता‌‌ पक्षाच्या वतीने गडचिरोली शहराचा विकास करण्यासाठी आपण कटीबध्द आहोत अशी ग्वाही नगराध्यक्ष निंबोरकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिली
भेटीच्या वेळी आमदार कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. देवराव होळी , माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महामंत्री गोविंद सारडा, युवा नेते सागर निंबोरकर आदिं उपस्थित होते .
आगामी काळात गडचिरोली शहराच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता असल्याचे बोलल्या जाते.