Home Breaking News “छोट्या संमेलनांचाच पुढे मोठा मंच होतो ” “आम्ही लेखिका ” चा...

“छोट्या संमेलनांचाच पुढे मोठा मंच होतो ” “आम्ही लेखिका ” चा अभिजात मराठी साहित्य मेळावा संपन्न

96
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

“छोट्या संमेलनांचाच पुढे मोठा मंच होतो “

“आम्ही लेखिका ” चा अभिजात मराठी साहित्य मेळावा संपन्न

चंद्रपूर -किरण घाटे

अनेक छोटया संमेलनांचाच पुढे मोठा मंच होतो . मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास म्हणजेच ” लेखिका ” हा जागतिक पातळीवरचा मंच आहे . मीरारोड येथे दि. २७ डिसेंबर २०२५ शनिवारी संपन्न झालेल्या आम्ही लेखिका आणि स्वरसंगम आयोजित “अभिजात मराठी साहित्य मेळाव्यात ” प्रा. सुनंदा पाटील – अध्यक्ष आम्ही लेखिका , तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष या नात्याने बोलताना म्हणाल्या . त्या पुढे म्हणाल्या की, फक्त चूल आणि मूल सांभाळणाऱ्या हातात लेखणीही तेवढीच शोभून दिसते . गृाहिणी म्हणजे केवळ गृहीत धरली जाणारी स्त्री ही व्याख्या आता बदलायला हवी .
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या होत्या वसई येथील डॉ. पल्लवी परुळेकर बनसोडे . गृहिणींचे हात लिहिते झाल्याबद्दल ताईंनी आपल्या भाषणात समाधान व्यक्त केले . या कार्यक्रमात ” पाचवा कोपरा ” – लेखिका प्रा. सुनंदा पाटील आणि ” अंतर्नाद ” लेखिका शिल्पा देवळेकर या दोन कथासंग्रहांचे प्रकाशन डॉ. पल्लवी परुळेकर बनसोडे आणि अनुवादक अक्षता देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमात २०२४ या वर्षातील प्रकाशित महिलांचा विविध ग्रंथांना पुरस्कृत करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक अंजना कर्णिक यांचा या प्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक शिल्पा देवळेकर यांनी केले .

कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आम्ही लेखिका केंद्रिय समिती सदस्य सुनिता बाफना डहाणू यांच्या अध्यक्षतेखाली कवायित्री संमेलन पार पडले. पूजा काळे आणि कल्पना उबाळे यांनी सूत्रसंचालन केले . तर ज्येष्ठ कवयित्री कल्पना म्हापूसकर यांनी आभार प्रदर्शन केले .
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ लेखिका नीला बर्वे या खास सिंगापूरहून आल्या होत्या . नागपूरच्या अदिती देशमुख, डॉ. शिल्पा जोशी , स्वाती नातू डॉ. चव्हाण , पुष्पा कोल्हे, प्रियदर्शिनी नाबर या व अशा अनेक आस्वादक लेखक / लेखिकांची या प्रसंगी उपस्थिती लक्षणीय होती.