
•सहज सुचलं गृपचे थाटात बाराव्या वर्षात पदार्पण!
• नव वर्षाच्या दिल्या समाजसेविका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांनी सर्वांना शुभेच्छा व शुभकामना!
सुवर्ण भारत: किरण घाटे
कला,क्रीडा,साहित्यिक,शैक्षणिक संगीत व सामाजिक क्षेत्रातील नवोदित कलावंतांना सदैव प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपचे येत्या एक जानेवारीला थाटात 12 व्या वर्षात पदार्पण होत आहे.
तदवतचं सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे व मायाताई कोसरे यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.
सहज सुचलं साठी जेष्ठ साहित्यिक विजया भांगे, कवयित्री शैला चिमड्यालवार, साधना धकाते, रजनी रणदिवे या शिवाय मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, किरण साळवी,चंदा कामडी, चैताली आतराम, वैजयंती गहुकर, वैशाली राऊत,अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, शिवानी झाडे, सारीका उराडे ,साक्षी वाडगूरे, रश्मी हिवरे, सीमा पाटील, प्रियंका गायकवाड, मंगल मिसाळ,आदिंचे योगदान मोलाचे ठरले आहे.
चंद्रपूर वरुन सुवर्ण भारतसाठी आमचे विशेष प्रतिनिधी किरण घाटे!


