Home Breaking News शेतमजूर व इत्तर ग्रामीण मजूर युनियनचे अधिवेशन थाटात संपन्न

शेतमजूर व इत्तर ग्रामीण मजूर युनियनचे अधिवेशन थाटात संपन्न

53
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

शेतमजूर व इत्तर ग्रामीण मजूर युनियनचे अधिवेशन थाटात संपन्न

चंद्रपूर -किरण घाटे

महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन ( लाल बावटा) AIAWU, चंद्रपूर तालुक्याचे पहिले अधिवेशन कॉम्रेड अण्णाभाऊ साठे सभामंच, गगनगिरी, एमआयडीसी, दाताळा रोड येथे थाटात संपन्न झाले. या प्रसंगी उद्घाटक म्हणून कॉ. विनोद गोविंदवार, राज्य सहसचिव, नांदेड,अध्यक्षस्थानी कॉम्रेड राजेश पिंजरकर व प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. किशोर जामदार उपस्थित होते. लाखो शहिदांच्या रक्ताने रंगलेल्या लालबावट्याचे अध्यक्षाच्या हस्ते रोहन करून व शहीद स्मारकाला सलामी देऊन अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. तद्वतच ‘कॉ. अण्णाभाऊ साठे चौक फलकाचे’ अनावरण करण्यात आले. संघटनेचे समन्वयक कॉ. अरुण भेलके यांनी अधिवेशनाचे सूत्रसंचालन करत प्रास्ताविक सादर केले. उदघाटनिय भाषण करताना कॉ. विनोद गोविंदवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर यांची संख्या अपार आहे आणि त्यांच्या समस्या असंख्य आहेत. परंतु ते संघटित नसल्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही.आपल्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधून ते सोडवून घ्यायचे असेल तर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याला पर्याय नाही. गरिबांनाऊ कष्टकऱ्यांना सरकारी आरोग्य सेवेवर तीळ मात्र विश्वास नाही. कारण आपला आजारी माणूस सरकारी दवाखान्यात जिवंत गेल्यावर तो जिवंत परत येणार की नाही याची धास्ती देणारी आपली सरकारी आरोग्य यंत्रणा आहे. ती बदलल्याशिवाय कष्टकऱ्यांना खरी व सोयीची आरोग्य सेवा मिळणार नाही. आम्ही संपत्ती निर्माण करणारे वर्ग आहोत. हे ध्यानात ठेवा आणि संपत्तीचा वाटा मिळवण्यासाठी संघटितपणे शेतमजुरांनी लढा द्यावा. मजबूत संघटीत शक्तीच इतिहास घडवत असते. हे दिल्ली शेतकरी आंदोलनाने आपल्याला दाखवून दिले आहे. हा आदर्श प्रेरणादायी आहे! विसरू नका! हा आदर्श अमलात आणा.’
मनरेगाचे जी राम जी करण्यामागिल सरकारच्या मनसुब्यावर भाष्य करत जेष्ठ बुद्धिजीवी किशोर जामदार म्हणाले, ‘ मनरेगा हक्क म्हणून मागेल त्याला काम देतो. ‘व्ही बी जी राम जी’ या कायद्यात केंद्र सरकार ठरवेल तेव्हा तिथे काम देईल. म्हणजे त्यात हक्क जाऊन सरकारची कृपादृष्टी येईल. यात ग्रामसभेची ताकद काढून घेतली आहे. प्रत्येक राज्याला किती निधी द्यायचं हे केंद्र ठरवेल. आता पर्यंत 100 दिवसाचा खर्च केंद्र व राज्य 90:10 अनुक्रमे करत होते…आता हे प्रमाण 40:60 असे झाले आहे. म्हणजे कामाचे दिवस जरी 125 केले, परंतु खर्च 60% केल्याने राज्यावर बोजा वाढणार…म्हणजे नाव बदलण्याच्या नावावर योजनेचे प्राणच केंद्र सरकार काढत आहे. याच निषेध व विरोध संघटितपणे केलाच पाहिजे.’
अध्यक्षीय भाषण करताना कॉ. राजेश पिंजरकर म्हणाले, ‘शेतमजूर व इतर मजूर यांनी संघटित होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढावे यासाठीच आपण हे अधिवेशन घेत आहोत.’ गायक सुधाकर बावणे यांनी प्रबोधनात्मक गीत सादर केले. या अधिवेशनात संघटनेची नवीन समिती नेमण्यात आली. ज्यात तालुकाध्यक्ष राजेश पिंजरकर, सचिव अरुण भेलके, कोषाध्यक्ष मारुती किन्नाके, उपाध्यक्ष अनुताई गेडाम व कडूजी ढोके, सहसचिव शीला गेडाम व विलास तोरणकर सदस्य रफिक खान पठाण, सोनू खरबनकर, बंडू थेटे , नीता ताजने यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

◾अतिक्रमित निवासधारकांना घरपट्टी द्या!
घरकुल मान्य झालेल्यांना त्वरित घरकुल द्या!
निराधारांना लाडकी बहिणीच्या दुप्पट निवृत्ती भत्ता द्या!
‘जी राम जी’ च्या नावावर मनरेगा ध्वस्त करणे बंद करा!
अनेक वर्षांपासून अतिक्रमित निवासधारक मजुरांना घरटॅक्स पावती व नमुना आठ लागू करा!भूमिहीनांना जमिनीचे वाटप करा! कसेल त्याच्या नावे करा!
ग्रामीण शेतमजूर व इतर मजूर कुटुंबीयांना शिक्षण व आरोग्याची विशेष सुरक्षा सुविधा बहाल करा! शेतमजुरांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा!
आधी ठराव अधिवेशनात पारित करण्यात आले. आभार कडूजी ढोके यांनी मानले तर अधिवेशनाच्या यशस्वी ते करीता विजय गायकवाड, संजय रेभणकर, परशुराम तोडासे, भाग्यश्री, रंजना ठाकूर, मजगवळी , येडे, सुमित वैरागडे, बंडू थेटे, गजानन मेश्राम, उत्तम गेडाम आदिंनी अथक परिश्रम घेतले.