Home Breaking News • आदर्श शिक्षक म्हणून कवयित्री कु.मंगल मिसाळ यांचा सत्कार! • साहित्यिक क्षेत्रातही...

• आदर्श शिक्षक म्हणून कवयित्री कु.मंगल मिसाळ यांचा सत्कार! • साहित्यिक क्षेत्रातही मिसाळ यांचे योगदान मोलाचे! • उल्लेखनीय कामगिरीसाठी कवयित्री मिसाळ यांना महाराष्ट्रातील सामाजिक संस्था व संघटनांचे अनेक सन्मान पुरस्कार बहाल

191
Oplus_16908288

• आदर्श शिक्षक म्हणून कवयित्री कु.मंगल मिसाळ यांचा सत्कार!
• साहित्यिक क्षेत्रातही मिसाळ यांचे योगदान मोलाचे!
• उल्लेखनीय कामगिरीसाठी कवयित्री मिसाळ यांना महाराष्ट्रातील सामाजिक संस्था व संघटनांचे अनेक सन्मान पुरस्कार बहाल

चंद्रपूर  :  किरण घाटे 

साहित्य क्षेत्रासोबतच गेल्या 20 वर्षांपासून विद्यार्थ्यांना सुसंस्कृत घडविण्याचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील ठाण्याच्या प्रख्यात कवयित्री कु.मंगल शामराव मिसाळ यांचा बुधवार दि. ३० डिसेंबर २०२५ ला आदर्श शिक्षक म्हणून एस.एम.जी.विद्यामंदिर, आगासन रोड, दातिवली दिवा -पूर्व या शाळेत शाळेच्या अँडमिन हेड अमिता गायकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शाळेचे सचिव स्वप्निल गायकर , इंग्रजी ,मराठी माध्यमांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद या शिवाय शिक्षकेतर कर्मचारी बंधू उपस्थित होते.
◾कु.मंगल मिसाळ ह्या महाराष्ट्रातील सुपरिचित कवयित्री असून त्यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी अनेक सन्मान पुरस्कार बहाल झाले आहे.
एवढेच नाही तर अनेक कविसंमेनात भाग घेऊन त्यांनी आपल्या काव्यरचना सादर केल्या आहेत.
◾ विदर्भातील समाजसेविका मायाताई कोसरे, जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, रंज्जू दिलीप मोडक नलिनी आडपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सहज सुचलं गृपच्या गेल्या चार वर्षांपासून त्या एक सदस्य आहेत.
मंगल मिसाळ ह्या नियमित या गृपवर आपले लिखाण करीत असतात.