Home Breaking News #Rajura • विज्ञान प्रदर्शनीत इन्फंट काँन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे यश ; नाविन्यपूर्ण संशोधनाने...

#Rajura • विज्ञान प्रदर्शनीत इन्फंट काँन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे यश ; नाविन्यपूर्ण संशोधनाने वेधले अनेकांचे लक्ष !

45

#Rajura

• विज्ञान प्रदर्शनीत इन्फंट काँन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे यश ; नाविन्यपूर्ण संशोधनाने वेधले अनेकांचे लक्ष !

राजूरा  : (चंद्रपूर )
◾किरण घाटे◾

राजूरा शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी २०२५ – २०२६ मध्ये इन्फंट जीजस सोसायटीद्वारा संचालित इन्फंट काँन्व्हेंट, राजुराच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा साक्ष दिली.
ही विज्ञान प्रदर्शनी दि. २९ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान गोपीकाबाई सांगडा आश्रम शाळा, राजुरा येथे पार पडली.
सदरहू प्रदर्शनीत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्जनशील मांडणी यांच्या जोरावर परिक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. इयत्ता सहावी ते आठवी गटात मास्टर सिद्धार्थ मलेश बंडा याने जैवविघटनशील प्लास्टिक (कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय) या पर्यावरणपूरक प्रकल्पासाठी प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे दिव्यांग गट (इयत्ता सहावी ते आठवी) मध्ये मास्टर कौस्तुभ कार्तिक गेडाम याने उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयावरील प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. तर इयत्ता नववी ते बारावी गटात कुमारी कल्पिता कार्तिक गेडाम हिने डिजिटल वर्ल्ड ऑन क्लाऊड – उद्योगमुख तंत्रज्ञान या आधुनिक विषयावरील प्रकल्पासाठी प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या गौरवात भर घातली.
या यशात मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, तसेच अश्विनी फासला व इतर विज्ञान शिक्षिकांचा मार्गदर्शनाचा वाटा आहे.
विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्गां कडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.