Home Breaking News आरोहीने मिळविले दुहेरी यश : विज्ञान प्रदर्शनीत वाजविला डंका !

आरोहीने मिळविले दुहेरी यश : विज्ञान प्रदर्शनीत वाजविला डंका !

52

आरोहीने मिळविले दुहेरी यश :
विज्ञान प्रदर्शनीत वाजविला डंका !

गोंडपिपरी (चंद्रपूर)
◾ किरण घाटे ◾
गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर येथे नुक

तीच तालुकास्तरीय विज्ञान प्रर्दशनी पार पडली यात चेकबेरडी येथील जिल्हा परिषद शाळेची विध्यार्थी आरोही अविनाश मांडवगडे या सहावीतील विध्यार्थीनीने शिक्षक प्रमोद दुर्गे यांच्या मार्गदर्शनात दोन वेगवेगळया विषयात यश मिळविले आहे.संपूर्ण प्रदर्शनीत आरोहीने आपल्या कलाकौशल्याने डंका वाजविला आहे.तिच्या या दुहेरी यशाने गावभर तिचे कौतुक केल्या जात आहे.
आक्सापूर येथे नुकतीच 53 वी विज्ञान प्रदर्शनीचा उपक्रम संपन्न झाला.यावेळी बिडीओ संजय पुप्पलवार,शिक्षणाधिकारी समाधान भसारकर,संस्थेच्या अध्यक्षा सुमनताई बामणकर, नोमाजी झाडे,विजय बामनकर,प्रविण बामणकर,किशोर कोल्हे,आक्सापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक अतूल कासनगोटटूवार यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
सदरहु विज्ञान प्रदर्शनीत क्रिश चनकापूरे,आराध्या येलमुले,संचीत अवथरे, ओमसाई कुबडे,यश कारेकार,साहिल एकोणकार,सुमीत आलाम,वृक्षाली गायकवाड,या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. शिक्षक निर्मीत साहित्य गटातून अरूण गावतूरे, विजय झाडे यांना यश मिळाले.
विज्ञान प्रदर्शनीचा बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला.यावेळी परिक्षक म्हणून रामकृष्ण चनकापूरे,विठठल राजुरकर,प्रा.नंदकिशोर पडोळे यांनी भुमिका बजावली.सर्व विजेत्यांचे आक्सापूर हायस्कूलच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.चेकबेरडी सारख्या अतिशय ग्रामीण भागातील शाळेतील आरोहीने बिनतारी विद्यूत संसर्ग हि प्रतिकृती तयार केली होती.सोबतच तिने प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला.तिच्या या यशाबाबत मुख्याध्यापक विलास भगत,मार्गदर्शक शिक्षक प्रमोद दुर्गे,श्वेता माकोडे,शामराव नैताम,भगीरथ मांडवकर यांनी कौतुक करित अभिनंदन केले आहे.