Home Breaking News दिपोत्सवाच्या ज्योती मधून शिक्षणाचा जागर प्रकाशमय करा- विशाल शिंपी ◾दिपोत्सव व शिक्षणाचा...

दिपोत्सवाच्या ज्योती मधून शिक्षणाचा जागर प्रकाशमय करा- विशाल शिंपी ◾दिपोत्सव व शिक्षणाचा जागर -एक उपक्रम

55

दिपोत्सवाच्या ज्योती मधून शिक्षणाचा जागर प्रकाशमय करा- विशाल शिंपी
◾दिपोत्सव व शिक्षणाचा जागर -एक उपक्रम
राजुरा( चंद्रपूर)
◾ किरण घाटे ◾

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण बघता ९० ते ९५% विद्यार्थी मराठी शाळेतून आलेले आहेत.मराठी शाळा ह्या सर्वकश शिक्षणाचा पाया आहे. हा पाया मजबूत करायचा असेल तर शिक्षणाचा जागर सामान्यांच्या घरापर्यंत पोहचला पाहिजे. तालुक्यातील टाॅप टेन शाळा मध्ये पाचगावची शाळा अव्वलस्थानी आहेत.देशात अग्रस्थानी असलेल्या पुणे जिल्ह्यातील बावळेवाडी शाळेच्या बरोबरीने येऊन पाचगाव शाळा राज्यात नावलौकिक करेल असा आशावाद राजुरा पं.स.चे भाग शिक्षणाधिकारी विशाल शिंपी यांनी व्यक्त केला.
पाचगाव ग्रा.पं.व जि.प.शाळेच्या संयुक्त विद्यमाने १ जानेवारी १८४८ रोजी भिडे वाड्यात महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींची पहिली शाळा दिवसांचे औचित्य साधून “शिक्षणाचा जागर व दिपोत्सव”कार्यक्रमाचे आयोजन केले. अध्यक्ष स्थानी प्र.सरपंचा उज्वला आत्राम, उद्घाटक भाग शिक्षणाधिकारी विशाल शिंपी, प्रमुख उपस्थिती केंद्र प्रमुख कल्पना श्रीकुंडावार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश गेडेकर, ग्रा.प.सदस्य मनोज कुरवटकर, बापुराव मडावी, कल्पना काकडे,उपसरपंच गोपाल जंबुलवार,सरपंच शंकरराव गोनेलवार,अंजनाबाई भोयर, संजीवनी कोटनाके, लहानुबाई सोनुले, विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गणेश पेटकर, उपाध्यक्ष प्रशांत भेंडे, ग्रामपंचायत अधिकारी विजय सातपुते, मुख्याध्यापक जहिर खान, सदस्य श्रीकृष्ण मेकलवार,शंकर झाडे, बाजार समितीचे संचालक संतोष इंदूरवार,विकास गौरकर,लक्ष्मण गेडाम,गुलाब भिवनकर,अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
क्रांतीसुर्य जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,शेख फातीमा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून कार्यक्रमांचे उद्घाटन झाले. केंद्र प्रमुख कल्पना श्रीकुंडावार,रूपेश गेडेकर यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थिनींनी सावित्रीबाईच्या जिवनावर प्रकाश टाकला.
मुलींची पहिली शाळा सुरू व नविन वर्ष दिवसांच्या आठवणीसाठी दिपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात शाळा परिसरात व मुख्य चौकात थाटात करण्यात आला. प्रास्ताविक ग्रा.पं.सदस्य बापुराव मडावी यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन शिक्षक सुधाकर कुळसंगे यांनी केले.उपस्थितीतांचे आभार शिक्षिका वर्षा चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रा.पं.कर्मचारी रामा आळे,शिक्षक अंबादास जाधव,खवसे,पेंटे,कु.अमिशा पिंगे कु.मेकलवार,यादव पिदुरकर,मयुर इरदंडे, किशोर भोयर यांनी अथक परिश्रम घेतले.