Home Breaking News राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या मोनाली पाटील निवडणूक मैदानात!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या मोनाली पाटील निवडणूक मैदानात!

78

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या मोनाली पाटील निवडणूक मैदानात!

चंद्रपूर -◾किरण घाटे

 

येत्या 15 जानेवारीला चंद्रपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
या निवडणुकीत आपलं नशीब आजमविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या मोनाली धीरज पाटील ह्या जटपूरा प्रभाग क्रमांक सात मधील अ गटातून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवित आहेत.
सामाजिक कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय व मोलाचे असून राजकीय क्षेत्रात वावरताना त्यांनी जनतेच्या न्याय हक्कासाठी शहरात अनेक आंदोलने उभी केली आहेत.
या शिवाय सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व्हावा यासाठी त्यांनी एका संघटनेच्या माध्यमातून सन्मान पुरस्कार देण्याचा एक उपक्रम देखील काही वर्षांपासून शहरात सुरू केलेला आहे.
सध्या त्यांचा प्रचार जोरात सुरू झालेला आहे.
त्या आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभागात मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.
प्रभाग सात मध्ये याच प्रभागातील ब गटातून अनुप किसन बेले व ड गटातून महेश लक्ष्मणराव काहीलकर नगर सेवक पदासाठी निवडणूक मैदानात उतरले आहेत.
प्रभाग सात मधील निवडणूक ही अतिशय रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.