Home Breaking News #Ballarpur • बामणी ग्रामस्थांची मागणी : चौक व उड्डाणपुलास छत्रपती संभाजी महाराजांचे...

#Ballarpur • बामणी ग्रामस्थांची मागणी : चौक व उड्डाणपुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे

102
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

#Ballarpur
• बामणी ग्रामस्थांची मागणी : चौक व उड्डाणपुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे

सुवर्ण भारत: शंकर महाकाली ( संपादक)

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील ग्रामपंचायत बामणी हद्दीतील महत्त्वाच्या सार्वजनिक चौकासह उड्डाणपुलास “छत्रपती संभाजी महाराज” यांचे नाव देण्यात यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात आज २ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत बामणी येथे सरपंच प्रल्हाद अलाम यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक गणेश परसुटकर उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बामणी गावातील सदर चौक व उड्डाणपूल हे दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून आजतागायत त्यांना कोणतेही अधिकृत नाव देण्यात आलेले नाही. पराक्रम, शौर्य, स्वराज्यनिष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे नाव या सार्वजनिक ठिकाणांना देण्यात आल्यास, नागरिकांमध्ये इतिहासाविषयी आदरभाव वाढण्यासह राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ होईल.

यावेळी ग्रामपंचायतीने चौकास नाव देण्यासाठी ठराव मंजूर करून ग्रामसभेची मान्यता घ्यावी, तसेच उड्डाणपुलास नाव देण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणा व महामार्ग प्राधिकरणाकडे शिफारसीचा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी करण्यात आली.

ग्रामपंचायत प्रशासनाने सदर निवेदन स्वीकारून शासनाच्या नियमानुसार योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

हे निवेदन साहिल घिवे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सोनु तुराणकर, प्रफुल कांबळे, यश थेरे, अक्षय घाटे, हिमांशु वाघधरे, मयुर भावे, अंकुश पिंपळकर, नयन साळवे, केतन खंडागडे, हर्षल दुरटकर, हितेश साळवे, रवी डेरकर, सागर जीवतोडे, यश साळवे व प्रज्योत मसराम यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.