Home Breaking News #Ballarpur • पोलीस रेझींग डे निमित्त बल्लारपूर पोलीस स्टेशनतर्फे विद्यार्थ्यासाठी जनजागृती उपक्रम

#Ballarpur • पोलीस रेझींग डे निमित्त बल्लारपूर पोलीस स्टेशनतर्फे विद्यार्थ्यासाठी जनजागृती उपक्रम

68
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

#Ballarpur
• पोलीस रेझींग डे निमित्त बल्लारपूर पोलीस स्टेशनतर्फे विद्यार्थ्यासाठी जनजागृती उपक्रम

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : सेवा, शौर्य, समर्पण व विश्वास या ब्रीदवाक्याअंतर्गत महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझींग डे बल्लारपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने २ जानेवारी ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांच्या प्रारंभी ३ जानेवारी २०२६ रोजी वियाणी शाळा, बल्लारपूर येथील विद्यार्थ्यांना बल्लारपूर शहर पोलीस स्टेशनला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शाळेतील एकूण ३० विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमात पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पोलीस दलातील विविध शस्त्रांची प्रात्यक्षिक माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या साधनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच डायल ११२, पीटर मोबाईल, सेकंड मोबाईल आदी पोलीस वाहनांबाबत माहिती देण्यात आली.

आपत्कालीन कार्यपद्धती, शहरातील विविध भागांतील पेट्रोलिंग व्यवस्था, महिलांची सुरक्षितता तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील जनजागृती बाबतही विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती दिली.

यामध्ये डीबी कक्ष, गोपनीय कक्ष, सेशन पथक, निर्भया पथक, महिला संरक्षण कक्ष, वायरलेस रूम, मुद्देमाल कक्ष, पुरुष व महिला आरोपी लॉकअप, सायबर कार्यालय, वाहतूक कार्यालय तसेच अर्ज शाखा यांचे कार्य समजावून सांगण्यात आले.

महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे यांनी पोस्को कायदा, महिलांची व मुलींची छेडछाड तसेच बाल लैंगिक अत्याचार यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान सायबर शाखेचे पोहवा भास्कर चिंचोलकर व पोलीस अंमलदार सचिन राठोड यांनी सोशल मीडियाच्या गैरवापराविषयी माहिती देत १८ वर्षांखालील मुला-मुलींनी इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप व फेसबुकसारख्या सोशल मीडिया खात्यांचा वापर करू नये, तसेच सोशल मीडियावरील गैरवापराची माहिती पोलीस यंत्रणेकडे उपलब्ध असते, असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.

हा संपूर्ण कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, मदन दिवटे, पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम, सलीम शेख, उमेश जोगदंड, मुद्देमाल कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर मडावी, वाहतूक शाखेचा स्टाफ, गोपनीय कक्षाचे पोलीस हवालदार महेंद्र वन्नकवार व त्यांचा स्टाफ, डीबी पथक, पोस्को पथकातील महिला अधिकारी करिष्मा मोरे व त्यांचा स्टाफ, महिला कर्मचारी कल्याणी पाटील, अर्चना, प्रज्ञा कांबळे तसेच वियाणी शाळेचे शिक्षक अनिल चापले, सोनाली आमटे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.