क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेसौ.
शैला चिमड्यालवार सावली
रूप तियेचे करी विच्छीन्न
पुरुषी मानसिकतेचा प्रहार
नकोसे झाले त्यांचे जगणे
सावित्रीबाईंनी न मानीली हार…..
काय होते? चूल आणि मूल
हेच जीवन जगत असतांना
दिली स्वातंत्र्य जाण त्यांनी
धडाधड संघर्ष करतांना….
बुरसट विचारांची आहुती
देवूनी लढल्या समाजाशी
इतिहासातल्या त्या युगस्त्री
सरसावल्या ध्येय गाठण्यासी….
मनात जिद्दीची पराकाष्टा
जपली विज्ञानाची आवड
चिखलातले कमळ उमलले
करुनिया शिक्षणाची निवड….
अनेक निराधार बालिकांना
तत्पर वस्तीगृही वसविल्या
स्वावलंबाने अंधारजाळे दूर होता
ज्ञानाच्या ज्योती तेवविल्या…
सौ. शैला चिमड्यालवार सावली


