Home Breaking News ⬜सावित्रीबाई फुले ज्ञानाची ज्योत !

⬜सावित्रीबाई फुले ज्ञानाची ज्योत !

141

⬜सावित्रीबाई फुले ज्ञानाची ज्योत !

विद्येची जननी सावित्रीबाई
स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटली
केला तिरस्कार तिचा
पण ती मागे नाही सरली…..1

नाव तिचे सावित्रीबाई फुले
विनम्र अभिवादन त्या माऊलीस
अंधारातून प्रकाशाकडे
त्यांनी दाखवला मार्ग समाजास…..2

होते महान व्यक्तिमत्व
त्यांनी घडविला इतिहास
स्त्रियांना मार्ग मोकळा केला
लावला त्यांना शिक्षणाचा ध्यास…..3

स्त्री शिकली समाज सुधरेल
करून दिली जाणीव लोकांना
सोसला अपमान भारी त्यांनी
दिला समाजात मान स्त्रियांना…..4

अपमान सहन करून तिने
स्त्री ही सक्षम केली
सर्वांना शिक्षण देऊन त्यांनी
गोरगरिबांची सेवा केली …..5

माना धन्यवाद त्यांचे तुम्ही
लाख मोलाचा मंत्र दिला
मुलगी शिकली प्रगती झाली
फुल्यांनी देशाचा उद्धार केला……6

⬜✍️⬜सौ.वैजयंती विकास गहूकर कवयित्री चंद्रपूर