Home Breaking News • क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आरोही सुगम संगीत विद्यालय व...

• क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आरोही सुगम संगीत विद्यालय व स्वरप्रीतीकडून स्वच्छता दूतांचा सत्कार ! •  कार्यक्रमाला सुनिल रामटेकेंची उपस्थिती

165

• क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त
आरोही सुगम संगीत विद्यालय व स्वरप्रीतीकडून स्वच्छता दूतांचा सत्कार !
•  कार्यक्रमाला सुनिल रामटेकेंची उपस्थिती

राजुरा (चंद्रपूर) : किरण घाटे

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“square_fit”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व प्रीती व आरोही सुगम संगीत विद्यालयाच्या वतीने बालिका दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याच कार्यक्रमात देशपांडे वाडीत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्य करणारे तीन कर्मचारी यांचा सदावर्ते परिवाराकडून भेटवस्तू , शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच बालिका दिनानिमित्त संगीत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींचा देखील भेटवस्तू देऊन सन्मान केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिलीप सदावर्ते यांनी विभुषीत केले होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सुनील रामटेके उपस्थित होते.मंचावर केन्द्र प्रमुख अलका सदावर्ते , कार्यक्रम संयोजिका करुणा गावंडे, तंत्रस्नेही शिक्षिका छोटू सोमलकर ,सत्कारमूर्ती रुपेश धोटे सुरेश बहादे, व श्रीनिवास तुंगापेलि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात हे हंसवाहिनी या प्रार्थनेने सर्व महिला व विद्यार्थ्यांनी प्रतिमेचे पूजन वंदन करून केले. आपल्या प्रास्ताविकेतून केंद्रप्रमुख व कार्यक्रम संयोजिका अलका सदावर्ते यांनी सुगम संगीत गायन वादनाचे महत्त्व विशद करून संगीत प्रवासात दिवसेंदिवस गृहिणी सहभागी होत असून संगीत सामाजिक, सांस्कृतिक,व शैक्षणिक कार्यात अविरतपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे .गरजूंना मदत करून सहकार्याची भावना जोपासत आहोत त्यांनी यावेळी सर्व सत्कारमूर्तींचा थोडक्यात परिचय करून दिला. प्रमुख अतिथी म्हणून सुनील रामटेके यांनी सदावर्ते दांपत्याच्या सामाजिक सांस्कृतिक कार्यास शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले व मधुबन खुशबू देता हैं हे गीत दमदार आवाजात सादर केले त्यांना करुणा गावंडे यांनी साथ दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन सर्व बालगोपालांना व उपस्थित त्यांना करुणा गावंडे यांनी मार्गदर्शन केले व आपल्या गुरुचे आभार मानून अभिनंदन केले. स्वर प्रितीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते यांनी सर्व महिला टीम व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व सावित्रीच्या लेकी खूप उत्तम प्रकारे गायन करतात. प्रार्थनेने त्यांनी वातावरण निर्मिती केली यासाठी सर्व गायन टीमचे अभिनंदन केले. सत्कारमूर्ती रुपेश धोटे यांनी पण आपले मत व्यक्त करताना आजच्या सत्काराने आमची जबाबदारी अधिक वाढली आहे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली म्हणून सदावर्ते परिवाराचे आभार मानले. सर्व विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे दोन बालकलाकारांनी नयन रामटेके आणि आरुषी डवरे यांनी सर्व गाण्यांना पेटीवादन करून स्वरांची साथ दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना अलका सदावर्ते यांनी केली तर कार्यक्रमाचे सुरेख संचालन स्वरूपा झंवर यांनी केले .उपस्थितीतांचे आभार लता कुळमेथे यांनी मानले .गायन टीम विना देशकर, सुनिता कुंभारे, पायल ताजणे, पलक टिचकुले, संध्या बाळसराफ, प्रतिभा भावे, आशा वाटेकर, ज्योती कोरडे, स्नेहा वाटेकर, टीना तपासे, कल्पिता गेडाम, प्रीती झाडे,, ओम कार्लेकर, स्वराली पिंपळकर, आश्वी बोबडे, विवान, आत्राम, समिधा देठे, अविका कुलकर्णी, दियारा विधाते, त्रिशा चौधरी, संयुक्ता पिंपळकर यांनी गायन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता, गीतांजली गेडाम, शुभांगी वाटेकर, निर्जला तुमाने, कविता पचारे, आम्रपाली नळे व छोटू सोमलकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रगाणं गायनाने झाली.