Home Breaking News सहज सुचलं महिला गृप हा नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणारा एकमेव गृप ठरला-पूजा...

सहज सुचलं महिला गृप हा नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणारा एकमेव गृप ठरला-पूजा पाटील

44

सहज सुचलं महिला गृप हा नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणारा एकमेव गृप ठरला-पूजा पाटील

चंद्रपूर -किरण घाटे

समाजसेविका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृप हा नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणारा गृप ठरला आहे अशी प्रतिक्रिया उच्च शिक्षण घेणारी नवोदित कवयित्री पूजा दिलीप पाटील यांनी आज संध्याकाळी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
सहज सुचलं परिवार मधील सर्व सदस्यांची कामगिरी ही अतिशय उल्लेखनीय असून या गृपमध्ये अनेक कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्राप्त आहे.
आपणही या गृपवर आल्यावर आपणांसही जेष्ठ महिला साहित्यिकांकडून बरंच काही शिकायला मिळाल्याचे पूजा पाटील या वेळी म्हणाल्या.