⬜🔲अहंकार 🔲⬜!
🟨लेखिका सौ. शैला चिमड्यालवार सावली
तुम्ही जसे असाल तसे तुमचे आयुष्य जगत रहा फक्त अहंकार सोडून!कारण आपण एक सामान्य व्यक्ती असतो. अहंकार विना जगले की संपूर्ण जीवन आनंदमय होईल…
कसला असतो हो अहंकार? सौंदर्याचा, पदाचा, व्यक्तिमत्वाचा, हुशारीचा की पैशाचा सांगा? मुळातच आपले अंतःकरण तो उच्च तो नीच असे भेदभाव आणि विषमतेने भरले असते. हे सर्व माणसाच्या प्रगतीसाठी अतिशय घातक ठरू शकते फक्त काही काळ तुम्हाला यातून आनंद घेता येईल.
माणसाला जगायचे असेल तर शुद्ध मनाने शुद्ध विचाराने जगावे.. कोणताही अहंकार चिरकाल टिकणार नाही. तसेच कोणत्याही फुटकळ गोष्टींचा त्याग करण्यापेक्षा अहंकाराचा त्याग करावा. कडकडून भूक लागली की चटणी भाकर सुद्धा खातो व भरल्या पोटी पंचपकवान्नही नकोसं होतं त्यावेळी भूक महत्वाची मोठेपणाचा अहंकार सोडून चटणी भाकरीवर ताव मारावाच लागतो. कधीतरी गर्व खाली होते. आयुष्याचा प्रवास सत्य स्वाभिमानाने करा अपेक्षांचे ओझे कमी होईल. आत्मिक आनंद घेता येईल.
काही लोकं स्वतः कुठलाही सारासार विचार करण्याची तसदी घेत नाही.. अहंकार असतो मी जे करणार तेच खरं राहील. परंतु कालांतराने त्यांचा काळ त्यांची बुद्धिमत्ता, तारतम्य,विवेक खाऊन टाकतो. कित्येकांच्या अंतर्मनातच अंधार असला तर लाखो दिव्यांची रोषणाई देखील व्यर्थ असते. अहंकारी बनून तुमचं मन गहाण ठेऊ नका. नाहीतर दुःख पदरी पडले तर व्याजासकट हिशोब द्यावा लागेल.आणि कुटुंब सुद्धा उध्वस्थ होऊ शकते..
आयुष्य इतकं सुंदर मिळालं आहे तर अहंकारपणा सोडून नवीन उमेद मिळाली पाहिजे असा आधार घ्या!
जसं हृदयस्पर्शी आपुलकीच्या शब्दाने मनातील आजार बरा होतो तसं अहंकारी न बनता त्यापासून दूर राहून निरोगी जगा!!
🟨लेखिका सौ. शैला चिमड्यालवार सावली



