‼️‼️कन्यादान ‼️‼️
ज्या कुटुंबात लेक आहे त्या कुटुंबात कन्या उपवधू झाली की उपवर शोधणे सुरु होते. आईबाबा या प्रसंगापासूनच हळवे होतात.. आणि बघा या प्रसंगाला आईवडिलांच्या मनात काय असते.. आपली लेक सासरी जाणार म्हणून भीती आणि लेकीचं कन्यादान करायला मिळणार म्हणून आनंदाश्रू…मुलगी बघायला येते म्हणताच पित्याचे पुरुषहृदय जागृत होते. हे भावनिक द्वन्द मनात चालत राहते.. सुख आणि दुःख लेक आणि पिता वाटून घेत जगतात.. त्यामुळे नात्यातील आपलेपणाचा ओलावा कायम टिकतं…लग्न जमलं म्हंटले की लेकीसाठी पित्याचं मन गहिवरते.. पुढील भाकीत रंगवत असतांना आपली लेक अगणित सुंदर स्वप्नांचा रंगीबेरंगी ताटवा घेऊन रांगोळीने सासरचे घर सुशोभीत करून सर्वांना आपलसं करणार… आपली लेक कधी मोठी झाली हे सुद्धा मन मानायला तयार होत नाही… सुस्थळी दिलेल्या लेकीची कायमची पाठवणी करतांना पित्याला दुःखाचं समाधान होते.. आणि दुःखाचा आनंदही होते.. लेकीच्या बापाशिवाय कुणालाही कळणार नाही. पिता सुंदर गोफ आपल्या हृदयात त्या दिवसापासून गुंफित असतो…
कन्यादानाच्या वेळी पित्याच्या अश्रुंच्या उदकाने कन्यादानाची पूर्तता होत असतांना इतर उदकाची गरजच काय? किती हृदयस्पर्शी प्रश्न मनाला भेडसावतो हे साहजिक वाटते प्रत्येकाला तरी पण विधिवतच केले जाते…
म्हणतात की हे सत्य आहे कन्यादानासारखे पुण्य नाही ज्याला मिळते त्याचे उज्वल भाग्य! लेकीकडनं पण त्यावेळी वदवून घेतात की धर्मेशच्य, अर्थेशच्य,नातीचरामि. मी धर्माचं पालन करणार, अर्थ पैसा जपून बाळगणार आणि नाती सर्वोतोपरी नेकीने सांभाळणार!!
” लेक लाडकी या घरची होणार सून तू त्या घरची ”
या विवाह संस्कारातील श्लोकचे वाईट मार्गाने उल्लंघन करणार नाही!!
🟩सौ. शैला चिमड्यालवार सावली





